Wed, Jul 24, 2019 14:11होमपेज › Konkan › गणेशोत्सव काळात आचरा रस्त्यावर पार्किंग बंदी 

गणेशोत्सव काळात आचरा रस्त्यावर पार्किंग बंदी 

Published On: Aug 31 2018 1:39AM | Last Updated: Aug 30 2018 11:36PMकणकवली : 

कणकवली शहरात वाहतूक कोंडी नियोजनाच्या दृष्टीने लक्झरी बस तायशेटे चौक ते नरडवे नाका या पट्ट्यात प्रवासी उतरविण्यासाठी  थांबविण्यात येतील. बाजारपेठ व महामार्गावर हातगाडी विक्रेत्यांना पूर्णत: बंदी असेल.तर एकदिशा मार्गाची कडक अंमलबजावणी. गाड्या पार्किंगसाठी डी़  पी़  रोडवर एका बाजूने पार्किंग, भालचंद्र महाराज रोडवर हॉर्नबील हॉटेलसमोर, युको बँकेनजीक आणि भालचंद्र महाराज आश्रम पार्किंग क्षेत्रात व्यवस्था करणे. गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी रोखण्याच्या दृष्टीने नियमांची कडक  अंमलबजावणी  करणे, कणकवली- आचरा मार्गावर मोटरसायकल व अन्य वाहनांना पार्किंग बंदी आदी निर्णय व्यापारी, नागरिक, नगरपंचायत, पोलीस यांच्या संयुक्‍त बैठकीत घेण्यात आला.

आगामी गणेशोत्सव पाश्‍वर्र्भूमीवर कणकवली नगराध्यक्ष दालनात नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती़. नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, प्रभारी मुख्याधिकारी देवानंद ढेकळे, नगरसेवक संजय कामतेकर, अ‍ॅड़ विराज भोसले, बंडू हर्णे, मेघा गांगण, अभिजित मुसळे, अबिद नाईक, व्यापारी संघाचे अध्यक्ष विशाल कामत, राजू पारकर, सदानंद बाणे, संदीप नलावडे, प्रभाकर कोरगांवकर आदींसह कणकवली शहरातील नागरिक व व्यापारी उपस्थित होते़.

कणकवली शहरात गणेशोत्सव काळामध्ये वाहतूक कोंडी कशामुळे होते.याची माहिती पोलीस प्रकाश गवस यांनी मांडली. त्यानुसार खासगी बसेस तायशेटे नाका ते नरडवे नाका दरम्यान प्रवास उतरविण्यासाठी लावायच्या नंतर या बसेस पार्किंगसाठी नरडवे रोडवर उभ्या राहतील. मुख्य चौक ते पारकर घरापर्यंतच्या  बाजारपेठेत माल उतरविण्यासाठी येणारी अवजड वाहने एकतर्फी लावण्यात यावीत.बाजारपेठेत नव्याने पट्टे मारून त्या पट्ट्यांच्या बाहेर दुकानदारांनी  दुकाने लावावीत. महामार्गावर दुचाकी पार्किंगसाठी रस्त्याच्या बाहेर चिखल असलेल्या ठिकाणी ग्रीट टाकावी.महामार्गावरील फुटपाथवर आलेले अतिक्रमण व भाजी-फळ विक्रेत्यांना अटकाव करण्याची मागणी करण्यात आली.त्यानुसार नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी या बैठकीत निर्णय घेतल्याचे सांगून कारवाईचा इशारा दिला.
 करंजे- नागवे मार्गावरुन येणार्‍या एसटी गाड्या भालचंद्र महाराज मठ रस्त्याने न आणता रेल्वे स्टेशनमार्गे आणण्याचे ठरविण्यात आले़. मोबाईल टॉयलेट डीपी रोड व भालचंद्र महाराज रोडवर ठेवण्याचे निश्‍चित करण्यात आले़.  महापुरुष मंदिर ते भालचंद्र महाराज संस्थान रोड व झेंडा चौक ते  भालचंद्र महाराज संस्थानकडे जाणार्‍या पाणंद बांधण्यासाठी  न. पं. कडून लाखो रुपये खर्च केले आहेत. मात्र, या पाणंद रस्त्यांवर बेकरी व्यवसायिक वाहने पार्किंग करून ठेवतात. त्यामुळे जाता-येता नागरिकांना त्रास होत आहे़. या वाहन चालकांवर नगरपंचायतच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार आहे़. शहरात ठिकठिकाणी नवीन निर्देशांबाबत फलक नगरपंचायतच्या माध्यमातून लावण्यात येतील़. गणेश चतुर्थी अगोदर दोन दिवस व्यापारी व नागरिकांना माहिती देण्यासाठी ध्वनीक्षेकपाद्वारे  जनजागृती करण्यात येईल, असे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी स्पष्ट केले़. या बैठकीत व्यापारी, नागरिक, नगरसेवक व अधिकार्‍यांनी  कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा केली़. जर कारवाई झाल्यास कोणीही मध्यस्थी करू नये, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.