Fri, Apr 26, 2019 15:55होमपेज › Konkan › आठवडा बाजारातील ग्राहकांना 1 हजार कापडी पिशव्यांचे वाटप

आठवडा बाजारातील ग्राहकांना 1 हजार कापडी पिशव्यांचे वाटप

Published On: Jan 31 2018 10:55PM | Last Updated: Jan 31 2018 10:13PMकणकवली : शहर वार्ताहर 

‘स्वच्छ कणकवली, सुंदर कणकवली’ चा संदेश देत सामाजिक कार्यकर्ते प्रशांत उर्फ भैया नाईक यांनी आठवडी बाजारात  एक हजार ग्राहकांना स्वखर्चातून कापडी पिशव्यांचे वाटप केले. कणकवली न. पं. च्या प्लॉस्टीक बंदी उपक्रमाला प्रोत्साहन म्हणून सामाजिक बांधिलकीतून आपण हा उपक्रम राबविल्याचे श्री. नाईक म्हणाले. या उपक्रमाचे व्यापारी व ग्राहकांनी कौतुक केले.

प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद व्हावा. नागरिकांना कापडी पिशव्या वापण्याची सवय लागावी, तसेच कणकवली शहराचा जबाबदार नागरिक म्हणून ‘स्वच्छ कणकवली’ उपक्रमासाठी आपले प्रयत्न असल्याचे  प्रशांत नाईक यांनी सांगितले.  या कापडी पिशव्या  त्यांनी शहरातील बचत गट महिलांकडून  पिशव्या शिवून घेतल्या. या पिशवी वाटपाचा शुभारंभ  पटकीदेवी मंदिर येथून नगराध्यक्ष माधुरी गायकवाड, मुख्याधिकारी अवधूत तावडे, न.पं. ब्रॅण्डअँबेसिडर प्रसाद राणे यांच्या हस्ते ग्राहकांना करण्यात आले. शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी नगरपंचायत प्रयत्नशील आहे. पर्यावरणाचा र्‍हास करणार्‍या प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर नागरिकांनी करावा, असे आवाहन मुख्याधिकारी अवधूत तावडे व नगराध्यक्षा  माधुरी गायकवाड यांनी केले.  प्रसाद राणे म्हणाले,आठवडा बाजारात प्रशांत नाईक यांनी कापडी पिशव्यांचे वाटप केले हा स्तुत्य उपक्रम आहे. कणकवली स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी हातभार लावणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे फिरते विक्रेते व ग्राहक यांनी याचा विचार करून कापडी पिशव्यांचा वापर करावा. विशाल नेरकर, रवींद्र गावडे, सुशील दळवी, श्री.कदम यांच्यासह न.पं.चे कर्मचारी,  विद्यामंदिर हायस्कूलचे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.