Wed, Aug 21, 2019 06:07होमपेज › Konkan › चिपळुणात महिलेवर वार 

चिपळुणात महिलेवर वार 

Published On: Mar 12 2019 1:49AM | Last Updated: Mar 12 2019 1:49AM
चिपळूण : खास प्रतिनिधी

शहरातील परशुरामनगर येथील मातोश्री अपार्टमेंटमध्ये एका सदनिकेत शिरून अज्ञाताने एका महिलेवर धारदार हत्याराने वार केले आहेत. यामध्ये शीतल सुरेश कदम (वय 55, मूळ रा. येगाव) या गंभीर जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी संशयितावर उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही.

ही घटना सोमवारी सकाळी 11 ते 1 या वेळेत घडली. महिलेचे पती सुरेश कदम हे बाहेर गेले असता अज्ञात व्यक्तीने दिवसाढवळ्या घरात शिरून शीतल कदम यांच्या मानेवर व हातावर सपासप वार केले. यानंतर तो निघून गेला. शीतल कदम या रक्ताच्या थारोळ्यात खूप वेळ पडून होत्या. दुपारी 1 वाजता हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले.