Mon, Aug 19, 2019 05:14होमपेज › Konkan › अरुणा प्रकल्पग्रस्तांसमोर ‘महसूल’ नमले

अरुणा प्रकल्पग्रस्तांसमोर ‘महसूल’ नमले

Published On: Sep 04 2018 11:38PM | Last Updated: Sep 04 2018 10:31PMवैभववाडी : प्रतिनिधी

अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या आक्रमक पवित्र्यामुळे अखेर महसूल प्रशासनाला 12/2 ची नोटीस घेऊन माघारी परतावे लागले. मंगळवारी सकाळपासूनच प्रकल्पस्थळी प्रकल्पग्रस्तांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले होते. दुपारी नोटीस परत नेल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

सोमवारी सकाळपासूनच प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्पस्थळी आंदोलन सुरू केले होते. मंगळवारी सकाळपासून त्यांनी मौंदे मार्गावर रास्तो रोको आंदोलन केले. दरम्यान, या मार्गावरील वाहतूक रोखून धरली. त्यामुळे एस.टी. बसही येथूनच मागे फिरवण्यात आली.  सकाळी  11 वा. सुमारास तहसीलदार संतोष जाधव, नायब तहसीलदार गमन गावीत कर्मचार्‍यांसह दाखल झाले. मात्र, त्यांच्याही गाड्या प्रकल्पग्रस्तांनी रोखून धरल्या. दरम्यान, भाजप युवा नेते संदेश पारकर, सभापती लक्ष्मण रावराणे, जि.प. सदस्य सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, राजेंद्र राणे यांच्यासह भाजप पदाधिकारी घटनास्थळी हजर झाले. या सर्वांनी प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे ऐकूण घेतले. आखवणे, नागपवाडी, 
भोम या तिन्ही गावची 12/2 ची नोटीस एकाच वेळी देण्यात यावी. निवाड्यातील त्रूटी दूर कराव्यात, घरांच्या फेर मुल्यांकन करुन मोबदला द्यावा. प्रत्येक शेतकर्‍याला विवरण पत्र देण्यात यावेत. बोगस प्रकरणांची चौकशी करावी. पुर्नवसन गावठाणाची कामे परिपूर्ण करावी. तोपर्यंत नोटीस देण्यात येऊ नये असे सांगितले. 

 आंदोलनकर्त्यानी आंदोलन मागे घेतले. अध्यक्ष रंगनाथ नागप, सचिव शिवाजी बांद्रे, सरपंच अनंत सुतार, सुरेश नागप, विजय भालेकर, तानाजी जांभळे यांच्यासह मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त आपल्या गुराढोरांसह या आंदोलनात सहभागी झाले होते.