Sat, Apr 20, 2019 10:43होमपेज › Konkan › १७ जानेवारीच्या संपात अंगणवाडी कर्मचारी सामील होणार : कमलताई परूळेकर

१७ जानेवारीच्या संपात अंगणवाडी कर्मचारी सामील होणार : कमलताई परूळेकर

Published On: Jan 06 2018 1:24AM | Last Updated: Jan 05 2018 10:31PM

बुकमार्क करा
ओरोस : प्रतिनिधी

केंद्रीय कल्याणकारी योजनांच्या खर्चाला  कात्री लावून  केंद्र सरकारने  त्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण केला आहे.  आय.सी.डी.एस. असो, एन.आर.एच.एम.  असो किंवा  शालेय पोषण आहार कर्मचारी व  रोजगार हमी योजना यासारख्या  योजनांचे  खाजगीकरण, कंपनीकरण, कंत्राटीकरण करून सरकार या योजनांना सुरूंग लावू पाहत आहे. त्यास  ताकदीने  विरोध करण्यासाठी 17 जानेवारीचा संप  यशस्वी करा असे आवाहन  अंगणवाडी कर्मचारी  सभेच्या  नेत्या कमलताई परूळेकर यांनी केले आहे. 

वरील सर्व योजनांना कायमस्वरूपी  दर्जा द्यावा, या सर्व योजनांमधील कार्यरत कामगारांना  शासकीय  दर्जा द्यावा व ही  प्रक्रिया  पूर्ण होईपर्यंत  इंटिरिम रीलीफ म्हणून दरमहा 18 हजार रू. मानधन द्यावे,  45 व्या भारतीय  श्रमपरिषदेच्या  योजना कर्मचार्‍यांसाठी  केलेल्या शिफारशी  लागू करा, कमी पटसंख्येच्या कारणासाठी प्राथमिक शाळा व अंगणवाड्या  सरकारने बंद करू नयेत, या व इतर कष्टकरी कामगारांच्या  मागण्यांसाठी 17 जानेवारीला  सर्व शिक्षक कामगार संघटनांनी भारत बंदची  हाक दिली आहे.  त्यात अंगणवाडी कर्मचारी सामील आहेत. 

 5 पेक्षा कमी मुले असणार्‍या  अंगणवाड्या दुसर्‍या  अंगणवाडीत समायोजित  करणार असे ना. पंकजा मुंडेंनी जाहीर केले.  सिंधुदुर्गच्या महिला बालकल्याण समितीने  त्यास माना डोलावून  दाद दिली.  याला काय म्हणावे? शिक्षण हा नफा कमविण्याचा व्यवसाय नसून राष्ट्र उभारणीचे  सेवाकार्य आहे. हे इतर अनेकांबरोबर संघाच्या  पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांनीही म्हटले आहे व तावडे, मुंडे यांनी वाचले नसावे असे दिसते.  3 वर्षाचे मूल 2-3 मैल चालून शेजारच्या अंगणवाडीत  जाऊ शकेल का? सिंधुदुर्ग डोंगराळ भाग आहे, अशा परिस्थितीत वरील निर्णयाला  जि.प.च्या  महिला बालकल्याण  समितीने  विरोध करायला  हवा होता असे त्या म्हणाल्या.