Thu, Jun 27, 2019 01:35होमपेज › Konkan › आंब्रड- टेंबवाडीत चार मृत माकडे : आरोग्य विभागाची धावपळ

आंब्रड- टेंबवाडीत चार मृत माकडे : आरोग्य विभागाची धावपळ

Published On: Jan 05 2018 1:15AM | Last Updated: Jan 04 2018 11:37PM

बुकमार्क करा
कुडाळ : शहर वार्ताहर

आंब्रड - टेंबवाडी येथे वस्तीलगत गुरूवारी एकाच वेळी चार मृत माकड आढळल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. आरोग्य यंत्रणेने तातडीने सतर्क होत खबरदारीच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनेसह या भागात सर्व्हे केला.मृत माकडांच्या शवविच्छेदनाचा व्हिसेरा तपासणीसाठी पुणे येथे पाठविणार असल्याची माहिती डॉ. कांबळी यांनी दिली.

आठ महिने ते दोन वर्षे  वयोगटातील ही माकडे असून यात  यंत्रणेला माहिती देताच आरोग्य, वन व पशु विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत चारही मृत माकडांचे शवविच्छेदन करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली.

आरोग्य यंत्रणेने सतर्कतेच्या दृष्टीने परिसरात औषध फवारणी केली. तसेच 86 घरांचा सर्व्हे केला. मात्र एकही संशयित तापाचा रूग्ण आढळला नाही. माकडांच्या शवविच्छेदनाचा व्हिसेरा तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश कांबळी यांनी घटनास्थळी 
भेट देवून कर्मचार्‍यांना आवश्यक सूचना दिल्या. आंब्रड सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.