होमपेज › Konkan › आंबोलीत ट्रक दरीत कोसळला

आंबोलीत ट्रक दरीत कोसळला

Published On: Jul 05 2018 3:19PM | Last Updated: Jul 05 2018 4:53PMआंबोली : वार्ताहर

गोवा ते पुणे माल वाहतूक करणारा टेंपो आंबोली घाटात चालकाचा ताबा सुटून संरक्षण कठडा तोडत 100 फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात चालक नीलेश बाळकृष्ण पवार (वय 30, रा. सातारा) हा सुदैवाने वाचला; पण त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी 9.45 वा. च्या सुमारास घडला.

ट्रक  गोव्याहून पुणे येथे  खत घेऊन चालला होता.  घाटात आंबोलीपासून 6 कि.मी. अंतरावर चालक पवार याचा आपल्या टेंपोवरील ताबा सुटल्याने तो संरक्षक कठडा 
तोडत येथील दरीत कोसळला. सुदैवाने टेंपोची समोरची काच फुटल्याने तो बाहेर फेकला गेल्यामुळेे तो बचावला.मात्र, ट्रकचे मोठे नुकसान झाले. या अपघताची माहिती आंबोली पोलिस हवालदार गजानन देसाई यांना समजताच ते तत्काळ घटनास्थळी जाऊन तेथे दरीत उतरून चालक सुखरूप आहे का याची खातरजमा केली. सुमारे 3 तासांच्या अथक प्रयत्नांती नीलेश पवार याला बचाव पथकांने दुपारी 1 वा. वर काढले.

चालकाला बाहेर काढण्यासाठी मोहीम,

आंबोली आपत्कालीन पथकाचे सदस्य दीपक मेस्त्री व 108 रुग्णवाहिकेला बोलावले. त्यानंतर आंबोली आपत्कालीन पथकाचे दीपक मेस्त्री व हवालदार गजानन देसाई दरीत उतरले.यावेळी रेस्क्यूसाठी लागणारे साहित्य आंबोली वनक्षेत्रपाल दिगंबर जाधव यांनी स्वतः घटनास्थळी उपलब्ध करुन दिले.दरीत उतरल्यावर सांगेली आपत्कालीन पथकाचे दाजी माळकर व अन्य एकाने  जखमी चालक पवार याला स्ट्रेचरवर बांधले.त्यांच्या मदतीला  बाबल अल्मेडा ही उतरले. सुमारे 3 तासांच्या अथक प्रयत्नांती नीलेश पवार याला बचाव पथकांने दुपारी 1 वा. वर काढले.  बचाव पथकात आंबोली आपत्कालीन पथकाचे दीपक मेस्त्री,दीपक नाटलेकर, योगेश पेंडसे, तेजस मेस्त्री व आंबोली ग्रामस्थ,तर सांगेली आपातकालीन पथक आणि आंबोली वनविभागाचे वनक्षेत्रपाल दिगंबर जाधव व अन्य 10 कर्मचारी यांनी या मोहिमेत सहभाग होता.  दरीतून बाहेर काढल्यावर 108 रुग्णवाहिकेने त्याला सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.