होमपेज › Konkan › कुडाळमध्येही ‘आरोग्याचे जनआक्रोश’ आंदोलन

कुडाळमध्येही ‘आरोग्याचे जनआक्रोश’ आंदोलन

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सिंधुदूर्ग : काशिराम गायकवाड

गोवा-बांबोळी सरकारी रूग्णालयात सिंधुदुर्गातील रूग्णांना मोफत आरोग्य सेवा मिळावी या मागणीसाठी कुडाळात बुधवारी सर्वपक्षीयांसह नागरिकांनी तहसीलदार कार्यालयालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे. सिंधुदूर्गातील लोकांनी दोडामार्ग येथे आरोग्याच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या ‘आरोग्याचा जनआक्रोश’ आंदोलनाला पाठिंबा दिला. 

गोवा सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन सिंधुदुर्गवासियांना न्याय द्यावा अन्यथा महाराष्ट्रातून गोव्यात जाणारी खडी, वाळू, भाजीपाला, मासे, दूध व अन्य वाहतूक रोखण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. या वेळी आंदोलनकर्त्यांनी  गोव्यात पूर्वीप्रमाणेच सिंधुदुर्गातील रूग्णांना मोफत आरोग्य सेवा मिळालीच पाहीजे, गोवा सरकार हाय हाय, एक दो एक दो गोवा सरकार फेक दो अशा घोषणा दिल्या. 

आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेवून प्रांतअधिकारी डॉ. विकास सुर्यवंशी यांनी निवेदन स्विकारले. गोवा सरकारने वेळीच सकारात्मक निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी शुक्रवार ३० मार्चला रोजी कुडाळात  जिल्हास्तरीय बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती वसंत(अण्णा) केसरकर यांनी दिली. भाजप वगळता या आंदोलनात सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नागरिकांनी सहभाग घेतला.
 

Tags : konkan, konkan news, all party protest in Kudal, doda marg protest, healthcare services protest in konkan


  •