Mon, Apr 22, 2019 22:11होमपेज › Konkan › वनराई बंधार्‍यांचा कृती आराखडा कागदावरच

वनराई बंधार्‍यांचा कृती आराखडा कागदावरच

Published On: Dec 31 2017 1:29AM | Last Updated: Dec 30 2017 11:12PM

बुकमार्क करा
रत्नागिरी ः प्रतिनिधी

 ‘पाणी अडवा पाणी जिरवा’  या योजनेअंतर्गत जिल्ह्यात उभारण्यात येणार्‍या वनराई बंधार्‍यांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी तयार करण्यात आलेला कृती आराखडा कागदावरच रेंगाळला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीत दहा बंधार्‍यांचे उद्दिष्ट ठेवले असताना त्या पैकी 30 टक्केच बंधार्‍यांचे काम पूर्ण झाले  आहे.

बंधारे  उभारण्यासाठी  प्रसिद्ध मोहिमेद्वारे उद्युक्‍त करण्यात आले असताना शासकीय  यंत्रणेत कुचराई होतअसल्याने बंधार्‍याचे काम डिसेंबर अखेरीसही कागदावरच  राहिले आहे. अलीकडेच झालेल्या बैठकीत संबंधित यंत्रणेची या बाबत कानउघाडणी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

कृषी विभाग, वनविभाग, आणि महसूल विभागासह सर्व शासकीय कार्यालयांना या योजनेंतर्गत सुमारे  साडेसात हजार वनराई बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते.  जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बंधारा बांधणीच्या उद्दिष्टाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने नवा कृती आराखडा तयार केला होता.  यामध्ये आतापर्यंत केवळ 1200 बंधारे पूर्ण करण्यात आले आहे.

या संदर्भात अलीकडेच प्रशासनाची बैठक झाली. या बैठकीत बंधारे इष्टांकापैकी निर्धारित कालावधीपेक्षा उद्दिष्ट दूर असल्याबाबत  अधिकार्‍यांची कानउघाडणी करण्यात आली.