Sat, Dec 07, 2019 15:20होमपेज › Konkan › ओखी चक्रीवादळाचा किनारपट्टीला फटका 

ओखी चक्रीवादळाचा किनारपट्टीला फटका 

Published On: Dec 04 2017 12:36AM | Last Updated: Dec 04 2017 12:44AM

बुकमार्क करा

आचरा: उदय बापर्डेकर

आचरा पिरावाडी येथे उधानाचे पाणी चढले आहे. उत्तम गांवकर यांच्या दरवाजापर्यंत पाणी आत घुसले आहे. मच्छीमारांची जाळी पाण्याखाली गेली आहेत. समुद्राला उधान आले असून जोरदार लाटा उसळत आहेत. गाऊडवाडी पुलावर पाणी आल्याने पिरावाडीचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे.

आचरा किनारपट्टीला उधणाचा तडाखा बसला आहे. समुद्राच्या लाटांची उंची वाढली असून मासेमारी नौका किनाऱ्यावर घेण्याचे काम सुरू आहे. पिरावाडी आणि गावूडवाडीला जोडणाऱ्या पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. होड्या, जाळी बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. देवबागमध्ये कुर्लेवाडीत पाणी घुसल्याने सर्व ग्रामस्थ रस्त्यावर आले आहेत.  

त्याचबरोबर दांडी येथे वस्तीजवळ पाणी आले आहे. कुबल रापण संघाची वाहून जात असलेली होडी वाचविण्याचे मच्छीमारांना यश आले. पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने सर्व मच्छिमार किनाऱ्यावर आले आहेत. मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण पाणी अजून वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.