Mon, Aug 19, 2019 05:07होमपेज › Konkan ›  मुंबई-गोवा महामार्गावर तिहेरी अपघात, ५ ठार

 मुंबई-गोवा महामार्गावर तिहेरी अपघात, ५ ठार

Published On: Mar 08 2018 9:46AM | Last Updated: Mar 08 2018 9:49AMगिमवी (गुहागर ) :  प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावर लोणेरे येथे पहाटे दोन ट्रकची सामोरा समोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार झाले. तर पाठीमागून येणारा मोटारसायकलस्वार ट्रकाला धडकल्यामुळे त्याचाही जागीच मृत्यू झाला.

या तिहेरी अपघातात एकूण ५ जण ठार झाले आहेत. आज पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. जोराची धडक बसल्यामुळे ट्रकांनी पेट घेतला आहे. 

दोन्ही ट्रकात मिळून ४ जण होते अशी प्राथमिक माहिती आहे. ते जागीच ठार झाले असून ट्रकातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या भीषण अपघातामुळे महामार्गावर पहाटे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.