Thu, Aug 22, 2019 11:07होमपेज › Konkan › गोळवलीनजीक अपघात;  एक ठार; पाच जण जखमी

गोळवलीनजीक अपघात;  एक ठार; पाच जण जखमी

Published On: Jan 08 2018 1:14AM | Last Updated: Jan 07 2018 11:31PM

बुकमार्क करा

संगमेश्‍वर : वार्ताहर 

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्‍वर तालुक्यातील गोळवली टप्पा येथे ट्रेलर आणि मॅक्स पिकअप जीप यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात प्रकाश गुणाजी जाधव (रा. अंधेरी, मुंबई) हा ठार झाला, तर 5 जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना रविवारी सकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास घडली. मनोज मनोहर जाधव, प्रवीण चंद्रकांत काते, विठ्ठल गणपत अवसरे, महेश गंगाराम खाके यांच्यासह 6 वर्षीय मयांक योगेश जाधव (सर्व रा. अंधेरी) हे जखमी झाले आहेत.

प्रकाश जाधव हा मॅक्स पिकअप गाडी (एमएच04 - जीएफ- 2404) घेऊन पाच जणांसह लांजा येथे मेहुण्याच्या घरी सामान घेऊन अंधेरीतून निघाला होता. दरम्यान,  गोळवली टप्पा येथे प्रकाशला दाट धुक्यामुळे गोव्याकडून मुंबईकडे निघालेल्या ट्रेलरचा (एमएच46-एआर-2723) अंदाज आला नाही. त्यामुळे मॅक्स पिकअप व ट्रेलर यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की, पिकअप गाडीचा पुढचा भाग चक्‍काचूर झाला. अपघातानंतर ही गाडी महामार्गापासून 30 फूट अंतरावर जाऊन 
उलटली.