Fri, Feb 22, 2019 18:15होमपेज › Konkan › कार अपघातात वडिलांचा मृत्‍यू, मुलगा गंभीर 

कार अपघातात वडिलांचा मृत्‍यू, मुलगा गंभीर 

Published On: Jun 19 2018 1:10PM | Last Updated: Jun 19 2018 2:17PMआंबोली/आजरा  : प्रतिनिधी

उत्तूर-निपाणी मार्गावर बहिरेवाडी गावाच्या हद्दीमध्ये कोल्हापूरच्या दिशेने चौकुळ (ता.सावंतवाडी) येथून जाणार्‍या कार (एमएच ०७ क्यू ६५४७)वरील ताबा सुटून आज सकाळी साडे सात वाजता झाडाला धडकून अपघात झाला. या अपघातात प्रदीप राजाराम गावडे (वय ४६, रा. चौकुळ, ता. सावंतवाडी, जि.सिंधुदूर्ग) यांचा जागीच मृत्यू झाला तर कौस्तुभ प्रदीप गावडे (१७) हा गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मेनन ॲण्ड मेनन कंपनीमध्ये नोकरीला असणारे प्रदीप गावडे हे सुट्टीनिमित्त गावी आले होते. आज सकाळी ते मुलगा प्रदीप याला महाविद्यालय प्रवेशासाठी सोबत घेवून कोल्हापूरला निघाले होते. दरम्यान सकाळी साडे सात वाजता बहिरेवाडी नजीक चोथ्यांच्या खोपीजळील वडाच्या झाडाला कारवरील ताबा सुटल्याने कार झाडाला आदळली. ही धडक एवढी जोरात होती की प्रदीप हे जागीच ठार झाले तर कौस्तुभ हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी गडहिंग्लज येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती बहिरेवाडीचे पोलिस पाटील सुरेश खोत यांनी आजरा पोलिसात दिली. पुढील तपास सहाय्यक फौजदार पांडूरंग दोरुगडे करीत आहेत. गावडे यांच्या पश्‍चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. गावडे यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच चौकुळ या गावावर शोककळा पसरली.

सावंतवाडी तहसिलदारांमुळे हालचाली वेगावल्या

अपघातादरम्यान सावंतवाडी तहसिलदार सतीश कदम हे कोल्हापूरहून सावंतवाडीच्या दिशेने चालले होते. अपघातातील गाडीची नंबलप्लेट व आरसीबुक पाहून तातडीने त्यांनी सावंतवाडी येथील गावडे यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला व जखमी कौस्तुभ याला गडहिंग्लज येथे उपचारासाठी दाखल करण्याच्या हालचाली केल्या.