Sun, Jan 20, 2019 14:28होमपेज › Konkan › तिहेरी अपघातात 6 जण जखमी 

तिहेरी अपघातात 6 जण जखमी 

Published On: Dec 26 2017 1:33AM | Last Updated: Dec 25 2017 10:50PM

बुकमार्क करा

साखरपा : वार्ताहर

रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात सोमवारी सकाळी झालेल्या एका विचित्र अपघातात भडकंबा येथील 4 तर कोंडगावातील 2 दुचाकीस्वार जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना कोल्हापूरला हलविण्यात आले आहे.

दादासाहेब लिपकर हा 12 चाकी ट्रकमधून (एमएच-09 सीयू-3744) कोळसा भरून कोल्हापूर ते रत्नागिरी असा येत होता. गायमुख ते कळकदरा दरम्यान हा ट्रक आला असता समोरून येणार्‍या दुचाकीस (एम.एच.-08 एए-7713) त्याची धडक बसली. यामध्ये दुचाकीवरील संदीप पांडुरंग तेजम (वय 36) आणि सोनू शांताराम गुरव (45, दोघेही रा. कोंडगाव जोयशीवाडी) हे जखमी झाले. या अपघातानंतर ट्रकचालक ट्रक वेगात घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असताना आणखी एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये जगदीश राजाराम कनावजे (45, रा. भडकंबा) आणि सुरेश सदाशिव शिंदे (42 रा. भडकंबा) हे (एम.एच. 08 वाय-3729) जखमी झाले. यानंतर पुन्हा या ट्रकचालकाने ट्रक तसाच भरधाव वेगात तसाच पुढे नेला असता त्याची धडक पुढे तिसर्‍या दुचाकीस (एम.एच.-08/3692) बसली. विजय गणपत पवार (वय  50) आणि मनोहर यशवंत बने (50, रा. भडकंबा) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने कोल्हापूरला उपचारासाठी नेण्यात  आले आहे.

अपघातानंतर ट्रकचालक ट्रकसह रत्नागिरीच्या दिशेने पळून जात होता. मात्र, निवळी येथे तो ताब्यात घेऊन चालकासह पोलिसांच्या स्वाधीन केला.