Sat, Mar 23, 2019 18:10होमपेज › Konkan › शिवशाही बस-टेम्पोची धडक; टेम्पोचालक ठार

शिवशाही बस-टेम्पोची धडक; टेम्पोचालक ठार

Published On: Mar 12 2018 10:54PM | Last Updated: Mar 12 2018 10:47PMआंबोली : वार्ताहर

आंबोली घाटातील मुख्य धबधब्यापासून काही अंतरावर सोमवारी सावंतवाडी - पुणे (निगडी) ही शिवशाही बस आणि  टाटा टेम्पो यांच्यामध्ये धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पोचालक  रमेश शिवाप्पा कांबळे (वय 30, रा. हेब्बाळ कसबान, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) यांचे  उपचार सुरू असताना निधन झाले, तर टेम्पोमधील भाजीविक्रेत्या शांताबाई दय्याप्पा नाईक (35), मालुबाई चनप्पा कांबळे (57), जावेद लमतुरे (35)  व हसीना लमतुरे (33, रा.माठेवाडा-सावंतवाडी)  या जखमींवर गोवा - बांबुळी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

सावंतवाडी  आगाराची (एम. एच.47  वाय.0301 ) ही शिवशाही  बस आंबोलीच्या दिशेने जात होती. तर टेम्पो संकेश्‍वर येथून भाजी भरून बांदा येथे जात होता. या दोन्ही वाहनात आंबोली घाटातील मुख्य धबधब्या जवळील वळणावर समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की टाटा टेंपोचा समोरील भागाचा पूर्णपणे चक्‍काचूर झाला. टेम्पोचालक रमेश शिवाप्पा कांबळे , शांताबाई दय्याप्पा नाईक  हे अतिगंभीर जखमी झाले. तर मालुबाई चनप्पा कांबळे  ही  महिलाही जखमी झाली.   टेंपोचालक रमेश  कांबळे यांच्या दोन्ही पायांना, डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली. जखमींना सावंतवाडी कॉटेज रुग्णालयात उपचार केल्यानंतर  गोवा - बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले.  दरम्यान, चालक रमेश कांबळे याचे उपचार सुरू असताना निधन झाले. 

सोमवारी बांदा येथे आठवडा बाजार असल्याने संकेश्‍वर येथील भाजी विक्रेते या बाजाराला जात होते. जावेद लमतुरे (35)  व हसीना लमतुरे ( 33, रा.माठेवाडा-सावंतवाडी) हे टेंपोच्या मागे हौद्यात होते. टेंपोला जोरदार धडक बसल्यावर टेपो पलटी झाल्याने आतील भाजी व सामान या दोघांवर पडले.