Thu, Apr 25, 2019 21:24होमपेज › Konkan › चरवेली येथे इन्होवा-रिक्षा अपघात

चरवेली येथे इन्होवा-रिक्षा अपघात

Published On: Dec 26 2017 1:33AM | Last Updated: Dec 25 2017 10:39PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

पाली नजीकच्या चरवेली पेट्रोलपंपासमोर इन्होवा आणि रिक्षा यांच्यात सोमवारी सायंकाळी 4.15 वा. सुमारास समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात 6 जण जखमी झाल्याने त्यांना उपचारांसाठी तातडीने नरेंद्र महाराज संस्थानाच्या रुग्णवाहिकांमधून रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.

इन्होवा चालक महेश कमलाकर सुर्वे (31) आणि त्याचा भाऊ योगेश कमलाकर सुर्वे (42) दोघेही रा. मुंबई आपल्या ताब्यातील इन्होवा (एमएच 04 डीएन 7327) घेऊन मुंबई ते राजापूर असे येत होते. त्याच दरम्यान रिक्षा चालक हरीश आत्माराम बेंद्रे (35, रा. साखरपा) हे आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच 08 सी 7488) मधून प्रवासी रामचंद्र जयराम जोशी (44), मंदार शंकर जोशी(22) आणि शंकर रामचंद्र जोशी(55) तिघेही रा. सारखरपा यांना घेऊन साखरपा ते रत्नागिरी असे येत होते. ही दोन्ही वाहने चरवेली पेट्रोलपंपासमोर आली असता त्यांची समोरा-समोर जोरदार धडक होऊन अपघात 
झाला. 

यात दोन्ही वाहनांमधील सहाही जण जखमी झाले. त्यांना तातडीने नरेंद्र महाराज संस्थानच्या दोन रुग्णवाहिकांमधून रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. सायंकाळी उशिरा याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.