Thu, Dec 12, 2019 08:33होमपेज › Konkan › भरधाव दुचाकी अंगावरून गेल्याने वृद्धाचा मृत्यू

भरधाव दुचाकी अंगावरून गेल्याने वृद्धाचा मृत्यू

Published On: Jan 16 2018 2:11AM | Last Updated: Jan 15 2018 9:17PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : प्रतिनिधी

भरधाव दुचाकी अंगावरून गेल्याने वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी सकाळी  राजापूर तालुक्यातील नाटे हायस्कूलजवळ घडला. प्रदीप सहदेव करगुटकर (वय 51, रा. आंबोळगड, करगुटकरवाडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

सोमवारी सकाळी प्रदीप करगुटकर हे दुचाकी (एमएच 08 एच 4932) ने आंबोळगड ते नाटे असे जात होते. ते नाटे हायस्कूलजवळ आले असता रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोचा आरसा त्यांच्या दुचाकीला लागल्याने ते दुचाकीवरून रस्त्यावर फेकले गेले. याचदरम्यान त्यांच्या मागून येणार्‍या एका भरधाव  दुचाकीस्वाराने त्यांच्या अंगावरून दुचाकी नेल्यामुळे प्रदीप करगुटकर यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर दुचाकीस्वाराने घटनास्थळी न थांबताच पळ काढला. याबाबत नाटे पोलिस ठाण्यात अज्ञात दुचकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.