Tue, Mar 19, 2019 20:35होमपेज › Konkan › कासार्डेत मोटारसायकल-ट्रक अपघातात स्वार जागीच ठार

कासार्डेत मोटारसायकल-ट्रक अपघातात स्वार जागीच ठार

Published On: Jan 29 2018 11:22PM | Last Updated: Jan 29 2018 11:14PMकासार्डे : वार्ताहर 

मुंबई-गोवा महामार्गावर कासार्डे पोकळे पेट्रोल पंपासमोर  तळेरे कडून कणकवलीच्या दिशेने जाणार्‍या मोटारसायकल स्वारला कॉलिस गाडीने जोरदार धडक दिल्याने  स्वार नंदकिशोर जयप्रकाश पालकर (27  रा. कलमठ) हा मागून येणार्‍या ट्रकच्या चाकाखाली सापडून  जागीच ठार झाला. काळजाचा थरकाप उडविणारा हा अपघात रविवारी रात्री 9.20 वा दरम्यान झाला. या अपघातात पल्सर मोटारसायकलचाही चुराडा झाला.  

ही धडक इतकी जबरदस्त होती की मोटारसायकल स्वाराच्या डोक्यावरील हेल्मेटही दुर्दैवाने बाजूला फेकले  गेले  आणि रस्त्यावर पडलेल्या स्वारच्या डोक्यावरून मागून आलेल्या आयशर टेंपोचे चाक गेल्याने स्वार नंदकिशोर   पालकर याच्या  डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. मृत युवकांच्या खिशात सापडलेल्या  लायसन्सवरून त्याची ओळख पटली. .
घटनास्थळापासून पोलिस दूरक्षेत्र  हाकेच्या अंतरावर असूनही पोलिस  अर्ध्याने तासाने  घटनास्थळी  आल्याने कासार्डे परिसरातील ग्रामस्थांच्या भावनाचा उद्रेक झाला. घटना स्थळी पोलिस पोहचू शकत नसतील आणि नेहमी कुलूप लावून पोलिस दूरक्षेत्र बंद असले तर ते हवे कशाला ?  असा संतप्त सवाल नागरिक विचारत होते.