Wed, Apr 24, 2019 19:33होमपेज › Konkan › तोंडवळी-तळाशील पर्यटन प्रकल्प मोजणी पुन्हा सुरू

तोंडवळी-तळाशील पर्यटन प्रकल्प मोजणी पुन्हा सुरू

Published On: Jan 03 2018 1:12AM | Last Updated: Jan 03 2018 1:12AM

बुकमार्क करा
आचरा : वार्ताहर

केंद्र शासनाच्या स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत तोंडवळी तळाशील किनार्‍यावर पर्यटन सुविधा उभारण्याच्या प्रकल्पासाठी किनार्‍यालगतच्या सर्व्हे नं. 77 मोजणीचे  ग्रामस्थांनी रोखलेले काम  ग्रामस्थांच्या संयमी भूमिकेमुळे  पुन्हा सुरू झाले आहे. मालवण तहसीलदार यांनी तोंडवळी सरपंच यांना काढलेल्या नोटिशीनंतर मंगळवारी सर्व्हे नं. 77 हद्दनिश्‍चितीचे काम हाती घेण्यात आले. यावेळी तोंडवळी-तळाशील ग्रामस्थांनी प्रकल्प अधिकारी  दीपक माने यांच्याकडे भूमिका मांडताना आपला प्रकल्पास विरोध नसून वहिवाटीच्या जागा वगळून इतर जागेत प्रकल्प राबवण्यास हरकत नसल्याचे सांगितले. तर माने यांनी आपल्या हरकती विचारात घेतल्या जाऊन त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवला जाणार असल्याचे आश्‍वासन ग्रामस्थांना दिल्याने प्रकल्पाची मोजणी ग्रामस्थांच्या संयमी भूमिकेमुळे पुन्हा एकदा चालू झाली.

ग्रामस्थांच्या विरोधानंतर मालवण तहसीलदारांनी तोंडवळी सरपंच यांना नोटीस बजावत 2 तारखेला मोजणीच्या कामास पुन्हा सुरुवात केली जाणार असून सरकारी कामास सहकार्य करण्याचे आवाहन करत मोजणीत अडथळा आणल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे कळविले होते. मंगळवारी सकाळी 10 च्या सुमारास भूमिअभिलेखचे कर्मचारी यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पर्यटन प्रकल्प अधिकारी दीपक माने हजर झाले होते. यावेळी ग्रामस्थांसह तोंडवळी सरपंच आबा कांदळकर, माजी सरपंच संजय केळुसकर, उपसरपंच  दशरथ वायंगणकर, ग्रा. पं. सदस्य दशरथ कोचरेकर, रवी पाटील, प्रगती जुवाटकर, मनीषा तारी, मसुरकर आदी उपस्थित झाले होते. यावेळी ग्रामस्थांनी आपली बाजू प्रकल्प अधिकारी माने यांच्याकडे मांडताना सांगितले की, प्रकल्पास आमचा विरोध नाही. ‘रिकाम्या जागेवर प्रकल्प राबवा