Fri, Apr 26, 2019 09:22होमपेज › Konkan › आचर्‍याच्या सुकन्येची राष्ट्रीय स्तरावर झेप

आचर्‍याच्या सुकन्येची राष्ट्रीय स्तरावर झेप

Published On: Jan 22 2018 1:24AM | Last Updated: Jan 21 2018 10:16PMआचरा  :वार्ताहर

आचर्‍याची सुकन्या आणि सध्या मालवण येथील जयगणेश स्कुलची विद्यार्थिनी असलेल्या कु. आर्या संजय कांबळी हिने रोलर इनलाईन हॉकी संघात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करत हरियाणा येथे झालेल्या स्केटींग हॉकी स्पर्धेत तामिळनाडूवर  मात करत उपउपांत्य फेरीत धडक दिली आहे. यानंतर त्यांची कर्नाटक बरोबर लढत होणार आहे. स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यावतीने नाशिक येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्केटिंग हॉकी स्पर्धेत सिंधुदुर्गच्या सुकन्यांनी बाजी मारली आहे.

यात आचर्‍याची सुकन्या आर्या कांबळी, श्रावणी मयेकर, आदिती कोठावळे यांची महाराष्ट्र संघात निवड झाली. 19 जानेवारी रोजी हरियाणा येथे झालेल्या तामिळनाडू विरुद्ध महाराष्ट्र लढतीत कु. आर्या हिने विशेष कौशल्य दाखवत तामिळनाडूवर मात केली. यानंतर कर्नाटक बरोबर होणार्‍या पुढील लढतीत महाराष्ट्र संघाने बाजी मारल्यास 28 वर्षानंतर रोलर इनलाईन हॉकी स्पर्धेत महाराष्ट्राला मेडल मिळेल. कु. आर्याची राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्याबद्दल तिचे कौतुक होत आहे.