Tue, Jul 16, 2019 22:15होमपेज › Konkan › तळाशीलला सापडला महाकाय देवमासा

तळाशीलला सापडला महाकाय देवमासा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

आचरा : वार्ताहर

मालवण तालुक्यातील तळाशील-तोंडवळी किनारपट्टीवर शनिवारी सकाळी 7 वा. महाकाय देवमासा (ब्ल्यू व्हेल) मृतावस्थेत आढळून आला. हा देवमासा 25 फूट लांबीचा आहे. खोल समुद्रात जहाजाच्या धडकेत हा देवमासा जबर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज मच्छीमारांनी व्यक्‍त केला. तळाशील किनारी मृतावस्थेत देवमासा सापडल्याने तो बघण्यासाठी मच्छीमारांसह स्थानिक ग्रामस्थ व पर्यटकांनी एकच गर्दी केली होती. 

देवमासा मृतावस्थेत आचरा येथील मच्छीमारांना शुक्रवारी रात्री समुद्रात वार्‍याच्या प्रवाहासोबत मालवणच्या दिशेने वाहून जात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे हा मृतावस्थेतील देवमासा मालवणपर्यंतच्या किनार्‍यावर लागण्याची शक्यता मच्छीमारांनी वर्तवली होती. शनिवारी सकाळी मासेमारीस जाणार्‍या मच्छीमारांना समुद्रकिनारी महाकाय मासा तरंगताना दिसला.

मृतावस्थेतील व्हेल माशाची माहिती वार्‍यासारखी पसरताच अनेकांनी सकाळीच तळाशील किनारा गाठला. तोंडवळी सरपंच आबा कांदळकर, दादा कोचरेकर, दीपक कांदळकर, मिलिंद तारी, भाई आडकर या मच्छीमारांनी त्या देवमाशाला दोरीच्या सहाय्याने बांधून ठेवून वन विभागाच्या अधिकार्‍यांना कल्पना दिली. त्या माशाची विल्हेवाट लावण्यासाठी भलामोठा खड्डा खोदण्यात आला होता. मात्र, सकाळी 11 वाजेपर्यंत वन विभागाचे अधिकारी कार्यवाहीसाठी घटनास्थळी दाखल झाले नव्हते. 
 


  •