Fri, Jul 19, 2019 01:22होमपेज › Konkan › आचरा माळरानावर अग्नीतांडव

आचरा माळरानावर अग्नीतांडव

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

आचरा : वार्ताहर

आचरा-मालवण सागरी मार्गावरील टेंबली माळरानावर मंगळवारी भर दुपारी आग पसरली. या आगीच्या विळख्यात विद्युत सबस्टेशन व आजूबाजूच्या बागाही आल्या होत्या. मात्र ग्रामस्थ व महावितरणच्या कर्मचार्‍यांनी प्रसंगावधाने आग आटोक्यात आल्याने आंबा कलमबागा व वीज  सबस्टेशन थोडक्यात बचावले.  ही आग अज्ञात व्यक्तींनी लावल्याची चर्चा होती.
 मंगळवारी दुपारी 12.30 च्या सुमारास आचरा-टेंबली माळरानावर अचानक आगीचे लोळ  दिसू लागले.

आचरा सबस्टेशनमधील रूपेश चव्हाण यांनी सहकारी कर्मचार्‍यांना फोनद्वारे खबर दिली. या विठ्ठल साळकर, प्रकाश धर्णे, मुरारी जांभळे, विजय भाट हे वीज कर्मचारी तसेच आचरा-गाऊडवाडीतील ग्रामस्थ सत्यवान पांगे, आचरा सरपंच चंदन पांगे, जगदीश पांगे, दिलिप गावकर, विश्‍वास गावकर, नाईक, सुंदर पांगे, अवधूत पांगे, राजन गावकर, आचरा पोलिसपाटील जगन्नाथ जोशी, विठ्ठल धुरी यांना धाव घेत आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. सुमारे तासाभराने  रौद्ररूप धारण केलेली ही आग आटोक्यात  आली.