सावंतवाडी :प्रतिनिधी
आम आदमी पार्टीचे अध्यक्ष तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केदरीवाल, समविचारी पक्ष व नेते आता महाराष्ट्रात आपला झेंडा तिसर्या आघाडीच्या रुपाने रोवणार असुन 12 जानेवारी बुलढाणा- सिंदखेड येथे या भव्य मेळाव्याचे आयोजन केले असल्याची घोषणा माजी खासदार तथा शिवराज्यपक्षाचे प्रदेशाध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सावंतवाडीत केली.
ते पर्णकुटी विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत बोलत होते. मंदार गीते,विवेक राणे उपस्थित होते. देशाची सुरक्षितता शस्त्राशस्त्रांचे खाजगीकरण करुन केले जात आहे.शिक्षणातही खाजगीकरण आणले जात असताना जागतिकरण,उदारीकरणाच्या नावाखाली देशाची लूट चालू आहे. शेतकर्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. एकट्या कॉग्रेसला सत्तेतील भाजपाला रोखता येणार नाही यासाठी या तिसर्या आघाडीचा पर्याय आणला आहे. यामुळे स्वच्छ चारित्र्याचा नेता म्हणुन मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासह बामसेफ, मुस्लिम संघटना तसेच पुरोगामी समलक्ष्य असलेल्या संघटना व नेते एकत्र येत आहेत. आमचा मोठा शत्रू भाजपा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ही सभा बुलढाणा येथील सिंदखेड या राजमाता जिजाऊंच्या जन्मगावी होणार आहे.भाजपा हुकूमशहा व द्वेषाचे राजकारण करत असुन 12 जानेवारीपासुन संपुर्ण महाराष्ट्रात संघर्ष यात्रा सुरु करण्याचा यल्गार ब्रिग्रेडियर सुधीर सावंत यांनी सावंतवाडीत दिला. ही आघाडी नव्या जोमाने आता भाजपाच्या विरोधात फळी निर्माण करणार असुन आपला पक्ष आप सोबत न्यावा की नाही आदी अन्य बाबी याची घोषणा 11 तारखेला करू, अशी माहिती श्री. सावंत यांनी दिली.
कॉग्रेसला दिलेली 31 डिसे.ची डेटलाईन संपली
आपण काँग्रेसला 31 डिसेंबरची डेडलाईन दिली होती. अहमद पटेल यांनी यादरम्यान उत्तर न दिल्याने कम बँक चा प्रश्नच नसल्याचे ते म्हणाले. त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आले नसल्यामुळे हा पर्याय स्विकारला असुन निश्चीतच येथील लोक आपला स्विकार करतील, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.