होमपेज › Konkan › जि.प.चे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर

जि.प.चे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर

Published On: Dec 20 2017 1:41AM | Last Updated: Dec 19 2017 11:44PM

बुकमार्क करा

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

सन 2016-17 सालासाठीचे जि. प. आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर झाले असून, जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील आठ ग्रामसेवकांची  निवड या पुरस्कारांसाठी झाली आहे.  कुडाळ येथे होणार्‍या जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुपक्षी मेळाव्यात या ग्रामसेवकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 

जनतेची सेवा करण्यासाठी मिळालेल्या संधीचे सोने करून जनता आणि त्या योगे गावाची सेवा करत आदर्श  काम करणार्‍या ग्रामसेवकांना सिंधुदुर्ग जि. प. च्या वतीने दरवर्षी आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. 

यामुळे चांगले आदर्शवत असे काम करणार्‍या ग्रामसेवकांना अधिक प्रोत्साहन मिळते, तर इतर ग्रामसेवकांना यातून आदर्शवत  काम करण्याची नवऊर्जा लाभते. जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील प्रत्येकी एक ग्रामसेवकाची निवड या पुरस्कारासाठी करण्यात येते.