Sun, May 26, 2019 18:42होमपेज › Konkan › पिंगुळीतील युवकाचा विषारी द्रव प्राशनाने मृत्यू

पिंगुळीतील युवकाचा विषारी द्रव प्राशनाने मृत्यू

Published On: Mar 06 2018 10:39PM | Last Updated: Mar 06 2018 10:25PMकुडाळ : प्रतिनिधी

पिंगुळी-चिंदरकरवाडी येथील चेतन सिताराम धुरी (28) या  युवकाचे मंगळवारी जिल्हा रूग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले. त्याने विषारी द्रव प्राशन केल्याचा अंदाज जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केला. शवविच्छेदनानंतर व्हिसेरा तपासणीसाठी  राखून ठेवण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.    

चेतन गेल्या आठ वर्षापासून कुडाळ खरेदी-विक्री संघात गॅस मेकॅनिक म्हणून काम करत होता. गेले चार दिवस तो  कामावर आला नसल्याचे सांगण्यात आले.  सोमवारी रात्री  जेवण झाल्यानंतर चेतन आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेला. सकाळी उशिरापर्यंत तो न उठल्यामुळे कुटुंबियांनी त्याला दरवाजा ठोठावून उठवण्याचा प्रयत्न केला.  मात्र आतून प्रतिसाद मिळत नसल्याने शेजार्‍यांच्या मदतीने कौले काढून चेतनच्या खोलीत प्रवेश केला असता तो अत्यवस्थ स्थितीत आढळून आला. त्याला तात्काळ कुडाळ ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले. प्रथमोपचारानंतर जिल्हा रूग्णालयात पाठविले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.   चेतनच्या पश्‍चात आई, दोन भाऊ, काका-काकी, पुतण्या असा परिवार आहे.