Tue, Jul 23, 2019 06:15होमपेज › Konkan › मोबाईलवर बोलताना युवक ठार

मोबाईलवर बोलताना युवक ठार

Published On: May 01 2018 1:16AM | Last Updated: Apr 30 2018 10:45PMनांदगाव : वार्ताहर

देवगड-निपाणी मार्गावर असलदे मधलीवाडी येथे ट्रक व मोटारसायकल या दोन वाहनांमध्ये अपघात घडला. या अपघातात कोळोशी येथे वास्तव्यास असलेला (मूळ मध्य प्रदेश) मोटारसायकल चालक सोमनाथ (भैया) चौरासिया ठार झाला. मात्र, सुदैवाने मागे बसलेला त्याचा 10 वर्षांचा लहान मुलगा बचावला. ही घटना दुपारी 2 वा. च्या सुमारास घडली. नांदगावच्या दिशेला जात असलेला ट्रक व नांदगावहून कोळोशी येथे सुपर स्प्लेंडर येथील घरी भरधाव वेगात व मोबाईलवर बोलत जात असताना असलदे मधलीवाडी येथे नरे यांच्या घरासमोर आला असता सोमनाथ उर्फ भैया याचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले आणि समोरील ट्रकवर जाऊन आदळत मागच्या टायरपर्यंत गेला.यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर मार बसला तर पायाच्या चिंधड्या झाल्या.यावेळी ट्रक चालकाने वाचविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.

मात्र, सोमनाथ स्वत:ला सावरू शकला नाही. स्थानिक नागरिक व ट्रकचालकांनी तातडीने उपचारासाठी कणकवली रुग्णालयात पाठविले. मात्र,  सोमनाथ वाचू शकला नाही. काही मिनिटांपूर्वी सोमनाथ नांदगाव येथे मुलगा व आपण सरबत पिऊन कोळोशी येथे घरी जाण्यास निघाला. असलदे येथून दुचाकी भरधाव व एका हाताने मोबाईल वर बोलत जात असताना अपघात घडला कदाचित मोबाईलवर बोलणे टाळले असते तर वेळ चुकलीही असती. सोमनाथ परिसरात लादी,प्लास्टरचे काम करून आपले कुटुंब चालवत होता. मोठी मुलगी आठवीत, मुलगा चौथीत तर तिसरी मुलगी बालवाडीत शिकत आहे.त्यांच्या निधनाची बातमी कळताच पत्नी व मुलांनी हंबरडा फोडला.

Tags : Konkan, Youth, killed, because, mobile, phones