Mon, Apr 22, 2019 11:54होमपेज › Konkan › पाक, चीन युद्धांत शौर्य गाजविलेले यशवंतराव कदम कालवश

पाक, चीन युद्धांत शौर्य गाजविलेले यशवंतराव कदम कालवश

Published On: Aug 19 2018 11:05PM | Last Updated: Aug 19 2018 10:42PMचिपळूण : प्रतिनिधी

भारतीय लष्करात पाकिस्तान व चीन युद्धांमध्ये अतुलनीय पराक्रम गाजविलेले टेरवचे सुपुत्र यशवंतराव शंकर कदम यांचे पुणे येथे हृदयविकाराच्या आजाराने निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी सुनंदा यांच्यासह विवाहित सुपुत्र संतोष, चार कन्या, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

यशवंतराव कदम यांचे आई-वडील लहानपणीच वारल्याने त्यांचे प्राथमिक शिक्षण कोळकेवाडी येथे त्यांच्या मामाच्या येथे झाले. भारतीय लष्करात त्यांनी सेवा केली. 1962 च्या चीन व 1965 च्या पाकिस्तान युद्धांमध्ये त्यांनी अतुलनीय पराक्रम गाजविला. यामुळे त्यांना गौरविण्यातही आले होते. पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय सैन्य थेट लाहोरपर्यंत पोहोचले होते. या तुकडीत त्यांचा समावेश होता. निवृत्तीनंतर त्यांनी खासगी क्षेत्रात नोकरी केली. आपल्या मूळ गावी टेरवकडे त्यांचा विशेष ओढा होता. गणेशोत्सव, शिमगोत्सव आदी सणांना ते आवर्जून गावी येत. गावकर्‍यांना अनेक दु:खद प्रसंगांत त्यांनी मोठी साथ केली होती.