Mon, Jun 17, 2019 04:48होमपेज › Konkan › मोरयाचा धोंड्याचे पूजन करणे हे माझे भाग्य : गायकवाड

मोरयाचा धोंड्याचे पूजन करणे हे माझे भाग्य : गायकवाड

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मालवण : प्रतिनिधी 

छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची सागरी राजधानी असणार्‍या किल्ले सिंधुदुर्गच्या बांधकामाचे भूमिपूजन ज्या ठिकाणी झाले, त्या मोरयाच्या धोंड्याचे पूजन करणे हे माझे भाग्य आहे. शिवाजी महाराजांनी त्याकाळी सागरी मार्गांद्वारे  देशावर होणारे आक्रमण लक्षात घेऊन सागरी आरमार उभारून कोकण किनारपट्टीवर दुर्ग उभारले.आजही देशाला समुद्र मार्गे धोका असून शिवरायांचा दुरदृष्टिकोन समोर ठेवून आपण सर्वांनी शिवरायांचे मावळे बनून सागरी सुरक्षा करूया, असे प्रतिपादन अप्पर पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी केली. 

किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती व मालवण नगरपालिकेच्या वतीने ‘मोरयाचा धोंडा’या ऐतिहासिक स्थळावर शनिवारी शासकीय पूजन करण्यात आले. जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते मोरयाचा धोंडाचे पूजन व जलपूजन करण्यात आले.पोलिस निरीक्षक अरविंद बोडके, नायब तहसीलदार सुहास खडपकर, प्रेरणोत्सव समिती अध्यक्ष गुरुनाथ राणे, उपाध्यक्ष ज्योती तोरसकर, सचिव विजय केनवडेकर, डॉ. सुभाष दिघे, दत्तात्रय नेरकर, पालिकेचे आरोग्य सभापती आपा लुडबे, किल्ला रहिवाशी श्री. भोसले, नगरसेवक गणेश कुशे, नगरसेविका सेजल परब, तृप्ती मयेकर, पूजा करलकर, सुनीता जाधव, आकांक्षा शिरपुटे, प्रदीप वेंगुर्लेकर, भाऊ सामंत, महेश सामंत, संजय गावडे, रविकिरण आपटे, रवी तळाशीलकर, मुकेश बावकर, चांदेरकर, दत्तप्रसाद पाटकर, एस. एस. परूळेकर,भाऊ हडकर, वैशाली शंकरदास, साईनाथ गोसावी, आनंद तोंडवळकर, अविनाश मालवणकर, ढोले बाबू,. एम.एस. वालकर, शांती पटेल, सुधीर गोसावी, दशरथ कवटकर आदी व इतर शिवप्रेमी उपस्थित होते.

मोठे काम करूनच आपण आनंद घेतला पाहिजे, शिवरायांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी. पूजा करताना आनंद वाटला ऐतिहासिक ठिकाणी आल्याचे समाधान वाटले. शिवाजींचे मावळे म्हणून आम्ही जनतेची सेवा करत आहोत आणि करत राहणार. सिंधुदुर्गाला छत्रपतींचा आशीर्वाद प्राप्त आहे. सागरी सुरक्षा सर्वानी अबाधित ठेवायला पाहिजे यासाठी सर्वांनी मावळे बनून काम करूया,असे यावेळी गायकवाड यांनी सांगितले. सूत्रसंचालन ज्योती तोरसकर यांनी केले तर आभार विजय केनावडेकर यांनी मानले.