Tue, Mar 26, 2019 01:33होमपेज › Konkan › बेळगाव येथे ‘स्केटिंग मॅरेथॉन’मध्ये विश्‍वविक्रम

बेळगाव येथे ‘स्केटिंग मॅरेथॉन’मध्ये विश्‍वविक्रम

Published On: Jun 05 2018 1:17AM | Last Updated: Jun 04 2018 8:43PMदेवगड : प्रतिनिधी

बेळगाव येथील शिवगंगा रोलर स्केटींग क्लबच्यावतीने आयोजित ‘72 तास खेलो इंडिया मल्टीव्हिटीज स्केटिंग’ मॅरेथान मध्ये दोनशे मीटर स्केटींग ट्रॅकवर 72 तासांत 8,232 फेर्‍या मारून स्केटर्संनी नवा विश्‍वविक्रम केला. या स्केटर्समध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बारा मुलांचा समावेश होता. या स्केटींग मॅरेथानमध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी,  राजस्थान, गुजरात, हरियाणा, औरंगाबाद, सांगली, सातारा, नागपूर, दिल्‍ली, नाशिक, उत्तरप्रदेश आदी राज्यातील मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. 200 मीटरच्या स्केटिंग ट्रॅकवर 72 तास स्केटिंग करून क्रिकेट, हॉकी, खो-खो, संगीत खुर्ची, रोलबॉल आदी खेळ खेळून 8,232 फेर्‍यांचा नवा विश्‍वविक्रम रचला. 

या स्केटिंग’ मॅरेथॉनमध्ये सोमस्थ अ‍ॅकॅडमी स्केटिंग’ क्लब, कणकवली या संस्थेच्या माध्यमातून वेद दत्ताराम मुंज, ओवी अरविंद गायकवाड, आदर्श संजय जोशी (ओरोस), लावण्य परशुराम आळवे, उत्कर्ष शैलेंद्र डिचोलकर, मिहीर लीलाधर सावंत, धनराज शंकर खोटलेकर, सार्थक विलास खानोलकर (कणकवली), साहील अतुल पडेलकर, तपन संतोष नार्वेकर, नील विवेक ढेकणे, कौशल सुनील जाधव (देवगड) यांनी सहभाग नोंदविला होता. या मुलांना सोमस्थ अ‍ॅकॅडमीचे प्रशिक्षक वैभव सर्पे, श्रद्धा सावंत, तन्वी कदम यांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांचे अ‍ॅकॅडमीचे सचिव योगेश सामंत यांनी अभिनंदन केले आहे.