Sun, Jun 16, 2019 03:09होमपेज › Konkan › विजयदुर्ग किल्ल्यावर जागतिक हेलियम डे साजरा

विजयदुर्ग किल्ल्यावर जागतिक हेलियम डे साजरा

Published On: Aug 19 2018 1:31AM | Last Updated: Aug 18 2018 11:05PMविजयदुर्ग : वार्ताहर 

18 ऑगस्ट 1968 रोजी झालेल्या सूर्यग्रहणावेळी हेलियम वायूचा शोध शास्त्रज्ञानी लावला.या घटनेमुळे विजयदुर्ग किल्ल्याचे नाव जगाच्या नकाशावर कोरले गेले.जगातील एक मोठी घटना ज्या किल्ल्यावर घडली,तो किल्ला म्हणजे विजयदुर्ग.त्या किल्ल्यावर गेले 13 वर्षे प्रमोद जठार व विजयदुर्ग गावाच्यावतीने  जागतिक हेलियम डे साजरा केला जातो.यावर्षी देखील  ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यावर ग्रा.पं.ने हेलियम डे साजरा केला.

विजयदुर्ग जेटी ते किल्ल्यापर्यंत सर्व ग्रामस्थ तसेच शालेय मुलांनी  प्रभात फेरी काढली.रंगीबेरंगी फुगे घेऊन शालेय मुले या फेरीत सहभागी झाले होते.विजयदुर्ग किल्ल्यातील सायबाचे ओटे जेथे दुर्बीण लावून हेलियमचा शोध लागला त्याठिकाणी दुर्बीण ठेवून शालेय मुलांनी अवकाशाचे निरीक्षण केले.विजयदुर्ग किल्ल्यावरून  हेलियम वायूचा शोध लागून आज 150 वर्षे पूर्ण झालीर्. विश्‍वाच्या निर्मितीसाठी महत्वाचा असणार्‍या या वायूचा शोध विजयदुर्ग किल्ल्यावर लागला.यामुळे आजच्या दिवसाचे फार महत्त्व असून  पुढील वर्षी मोठ्या स्वरूपात हा कार्यक्रम विजयदुर्ग ग्रा.पं.च्या वतीने साजरा करणार असल्याचे सरपंच प्रसाद देवधर यांनी सांगितले.

माजी पंतप्रधान अटलबीहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे सात दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा असल्यामुळे साध्या पध्दतीने यावर्षी हेलियम डे साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला सुरूवातीलाच माजी पंतप्रधान अटलबीहारी वाजपेयी यांना श्रध्दाजंली वाहण्यात आली. सायबाचे ओटे येथे कायमस्वरूपी फलक करून हेलियम वायूच्या शोधाविषयी सर्वाना माहीती मिळावी म्हणून खगोलप्रेमी चंद्रकांत परूळेकर यांचे पुत्र पवन परूळेकर यांनी तयार केलेल्या फलकाचे अनावरण करण्यात आले.  राजेंद्र परूळेकर म्हणाले, येथील खगोलप्रेमींना संशोधन करण्यासाठी लागणार्‍या सुविधा या भागात मिळत नाहीत.यासाठी कायमस्वरूपी  तारांगण होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले.विजयदुर्ग माध्यमिक शाळेचे  शिक्षक जाधव यांनी यावेळी हेलियम वायूचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले.कार्यक्रमाला विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष नितीन जावकर,विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ अध्यक्ष यश वेलणकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.सूत्रसंचालन गणेश मिठबांवकर यांनी केले.