Tue, May 21, 2019 22:11होमपेज › Konkan › ज्या गावच्या महिला सक्षम तो गाव अग्रस्थानी 

ज्या गावच्या महिला सक्षम तो गाव अग्रस्थानी 

Published On: Mar 18 2018 1:07AM | Last Updated: Mar 17 2018 8:38PMदोडामार्ग : प्रतिनिधी

ज्या गावच्या महिला सक्षम तो गाव प्रगत गावांमध्ये अग्रस्थानी असेल, त्यामुळे फक्‍त महिला सक्षमीकरण म्हणून चालणार नाही तर महिलांनी सुद्धा व्यावसायिक प्रशिक्षण घेणे काळाची गरज आहे. ग्रामीण भागातील महिलांनी तर शेती औजारे हाताळण्याचे योग्य प्रशिक्षण घेतल्यास त्यांना गावातल्या गावातच मोठे रोजगाराचे मोठे साधन निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन साटेली भेडशी जि. प. सदस्या सौ. अनिशा दळवी यांनी केले.

हेवाळे ग्रामने अनेक अभिनव उपक्रमात आणखी एक महिलांसाठी नवा उपक्रम राबविताना तिलारी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेती औजारे उत्पादनात अग्रेसर असलेल्या किसान क्राफ्ट कंपनीकडून महिलांना औजारे हाताळणी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी हेवाळेतील महिलांनी  शेती औजारे हाताळण्याची मिळालेल्या संधीचे सोने केले. या प्रशिक्षण दरम्यान हेवाळेतील रणरागिनींनी स्वतः पॉवर टिलर, ग्रासकटर यासारखी कृषी औजारे चालवून पहिली. त्यामुळे महिलांमध्ये प्रगत तंत्रज्ञानाची कास धरत शेती क्षेत्रात उतरण्याचा आत्मविश्‍वास द्विगुणित झाला आहे.

हेवाळे ग्रामपंचायत आवारात हा कार्यक्रम झाला.जि. प. सदस्या सौ. अनिशा दळवी, डॉ. बाबासाहेब राणे, किसान क्राफ्ट कंपनीचे वितरण व्यवस्थापक यांसह हेवाळे सरपंच संदीप देसाई, ग्रामसेवक सचिन कांबळे व महिला ग्रामस्थ उपस्थित होते. आपल्या गावातील महिलांना गावातच अनेक महत्वपूर्ण शेती औजारे पाहण्यास व हाताळण्यास मिळल्याने तिलारी फार्मर कंपनी व किसान क्राफ्टचे सरपंच देसाई यांनी आभार मानले.

Tags: Women, Need time, Professional Training, Konkan News