Tue, Nov 20, 2018 13:37



होमपेज › Konkan › आराम बसची दुचाकीला धडक बसून महिला ठार

आराम बसची दुचाकीला धडक बसून महिला ठार

Published On: May 07 2018 2:02AM | Last Updated: May 06 2018 11:52PM



देवरूख : प्रतिनिधी

देवरूख-मेघी मार्गावरील पर्शरावाडी तिठा येथे खासगी आराम बसने दुचाकीला धडक दिल्याने रविवारी सकाळी 10.30 वा. सुमारास झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिला बसच्या मागील चाकाखाली चिरडली गेल्याने ती जागीच ठार झाली. संगीता संतोष पर्शराम (रा. देवरूख-पर्शरामवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे.

तुकाराम सीताराम पर्शराम (रा. पर्शरामवाडी) यांनी या संदर्भात  पोलिसांना खबर दिली. तुकाराम पर्शराम व त्यांची वहिनी संगीता पर्शराम हे काही कामानिमित्त रविवारी सकाळी दुचाकीवरून (एमएच-10, सीजे- 6468) हरपुडे येथे गेले होते. काम आटोपून ही दोघे पुन्हा पर्शरावाडीकडे परत असताना देवळेहून देवरूखकडे येणार्‍या आरामबसची  (एमएच-04, जेपी-2250)ची दुचाकीला  धडक बसल्याने हा अपघात झाला. 

आराम बस भरधाव वेगात असल्याने तिच्या बंपरची पर्शराम यांच्या  दुचाकीला धडक बसली. अपघातानंतर दुचाकी घसरून तुकाराम पर्शराम हे डाव्या बाजूला फेकले गेले तर संगीता या रस्त्याच्या बाजूला पडल्या. याचवेळी आरामबसचे मागील चाक संगीता यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात तुकाराम पर्शराम यांनाही दुखापत झाली आहे. अपघातानंतर संगीता यांचा मृतदेह विच्छेदनासाठी देवरूख ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला. 

या घटनेची माहिती मिळताच पर्शरामवाडीतील ग्रामस्थांसह संगीता यांच्या नातेवाईकांनी देवरूख ग्रामीण रूग्णालय परिसरात एकच हंबरडा फोडला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह पर्शरामवाडी येथे ने ऊन संगीता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हा अपघाताची नोंद देवरूख पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास हेड कॉन्स्टेबल प्रशांत शिंदे करीत आहेत.