Tue, Jul 16, 2019 09:59होमपेज › Konkan › विजयदुर्ग डेपोचे विलिनीकरण होऊ देणार नाही : दुधवडकर

विजयदुर्ग डेपोचे विलिनीकरण होऊ देणार नाही : दुधवडकर

Published On: Dec 23 2017 2:07AM | Last Updated: Dec 22 2017 8:40PM

बुकमार्क करा

कणकवली : प्रतिनिधी

विजयदुर्ग येथील एसटीच्या समस्यांबाबत शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांनी गुरूवारी शिवसेना पदाधिकार्‍यांसह सिंधुदुर्ग विभागनियंत्रक चेतन हसबनीस यांची भेट घेतली. विजयदुर्ग डेपोचे देवगड डेपोमध्ये विलीनीकरण प्रस्तावित असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी याबाबत विभागनियंत्रकांना विचारणा केली. या विलीनीकरणास शिवसेनेचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. 

यावेळी कणकवली विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख शैलेश भोगले, युवासेना  जिल्हाप्रमुख अ‍ॅड. हर्षद गावडे, उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, विजयदुर्ग सरपंच प्रसाद देवधर, कणकवली शिवसेना शहरप्रमुख शेखर राणे, मंदार सोगम, तेजस राणे, अरूण परब, महेश राणे आदी उपस्थित होते. 

यावेळी विजयदुर्गमधून रत्नागिरी, इचलकरंजी, सोलापूर, पुणे, पंढरपूर, बोरिवली या बस फेर्‍या नव्याने सुरू करण्याची मागणी करण्यात आली. तसेच रिक्‍त असलेली वाहक, चालक पदे त्वरित भरण्याची देखील मागणी करण्यात आली.विजयदुर्ग डेपोचे देवगड डेपोमध्ये प्रस्तावित विलीनीकरण संदर्भात परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची भेट घेऊन विलीनीकरण प्रस्ताव रद्द करण्याची मागणी करणार असल्याचे अरूण दुधवडकर यांनी सांगितले. यावेळी विजयदुर्ग डेपोसंबंधी एसटीच्या विविध प्रश्‍नांबाबत अरूण दुधवडकर आणि सेना पदाधिकार्‍यांनी विभागनियंत्रकांशी चर्चा केली.