Wed, Mar 20, 2019 09:04होमपेज › Konkan › दापोली नगराध्यक्षपदाचा दावेदार कोण?

दापोली नगराध्यक्षपदाचा दावेदार कोण?

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

दापोली : प्रवीण शिंदे

दापोली नगर पंचायतीच्या पुढील नगराध्यक्ष पदाचा दावेदार कोण? याची उत्सुकता समस्त दापोलीकरांना लागून राहिली आहे. उल्का जाधव यांच्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीला 26 मार्च 2018 रोजी सव्वा वर्षांचा कालखंड पूर्ण झाला. तसे यापूर्वी ठरवण्यात आले होते. त्यामुळे पुढील नगराध्यक्ष कोण होणार? याकडे लक्ष लागले असून कृपा घाग व शबनम मुकादम या नगरसेविका शर्यतीत आहेत.
सव्वा वर्षांचा कालखंड पूर्ण झाला असतानाही उल्का जाधव यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला नाही. आगामी नगराध्यक्ष पदासाठी तीनही इच्छुक नगरसेविका शिवसेनेच्या असल्याने पक्षातील अंतर्गत हालचाली व कुरबुरी वाढल्या आहेत. सध्या तरी उल्का जाधव राजीनामा देतील का? याची चर्चा सुरू आहे. 

28 डिसेंबर 2017 रोजी दापोली नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी उल्का जाधव या विराजमान झाल्या होत्या. त्यावेळी दापोली नगराध्यक्षपदासाठी कृपा घाग देखील इच्छुक होत्या. मात्र, पक्षश्रेष्ठींकडून आलेल्या  आदेशानंतर आणि उल्का जाधव यांच्यासाठी  सव्वा वर्षांचा कालखंड देण्याचे ठरल्यानंतर  कृपा घाग यांनी एक पाऊल मागे घेतले.  शिवसेना पक्षातील अल्पसंख्याक नगरसेविका शबनम मुकादम यांनी देखील नगराध्यक्षपदाची इच्छा व्यक्‍त केली होती.

शिवसेनेतील राजकीय नेत्यांनी राजीनाम्याची जबाबदारी दापोलीतील वरिष्ठ पदाधिकार्‍यांवर सोपवली आहे. जर उल्का जाधव यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नाही तर पक्षांतर्गत नवीन वादाला तोंड फुटू शकते. पुढील सव्वा वर्षांचा कालखंड आपणास मिळावा, अशी अपेक्षादेखील नगराध्यक्षा उल्का जाधव यांची आहे का? अशी चर्चा सध्या दापोलीत सुरू आहे. पुढील अडीच वर्षांमध्ये ओबीसी आरक्षण पडले आहे. त्यामुळे यातील परवीन शेख यांना वगळता अन्य कोणालाही नगराध्यक्ष पद भूषवता येणार नाही. त्यामुळे असलेले सव्वा वर्षांचे नगराध्यक्षपद पदरात पडावे म्हणून शिवसेनेतील तीनही महिला उमेदवार महत्त्वाकांक्षी दिसत आहेत. या सर्व घडामोडींमध्ये आगामी नगराध्यक्षपद उल्का जाधव, कृपा घाग, शबनम मुकादम यापैकी कोणाच्या पारड्यात पडते? याकडे लक्ष लागले आहे.

Tags : Konkan, Konkan news, President,  Dapoli, city


  •