Tue, Jul 16, 2019 02:22होमपेज › Konkan › ... जेव्हा आमदारच रस्त्यावर  उतरतात तेव्हा!!

... जेव्हा आमदारच रस्त्यावर  उतरतात तेव्हा!!

Published On: Jun 27 2018 1:20AM | Last Updated: Jun 26 2018 11:19PMरत्नागिरी : प्रतिनिधी

रस्त्यावरील खड्डे ही सर्वसमान्यांसाठी नित्याचीच समस्या आहे. पावसाळ्यात तर ‘रस्त्यातील खड्डे की खड्ड्यातील रस्ता’ अशी  सर्वसामान्यांची शोधाशोध सुरू असते.  मात्र, जेव्हा खुद्द आमदारांची गाडी खड्डे तुडवित जाते आणि त्याचे धक्के त्यांना सोसताना सहनशीलतेच्या पलीकडे जातात तेव्हा  आमदारांनाही काय हे खड्डे, कोण इथला नगरसेवक अशी ओरड करण्यासाठी अखेर रस्त्यावर उतरावे लागले.

रत्नागिरी शहराकडे जाणारा प्रमुख रस्ता तसा सुस्थितीत आहे. मात्र, काही भागात त्याला आता पावसाळा सुरू असल्याने खड्डे पडले आहेत. सध्या  शहरातील नागरिकांना आणि वाहनधारकांना हे खड्डे चुकवितच रस्ता चोखाळावा लागत आहे. शहरातील माळनाका येथे मात्र  या मुख्य रस्त्याची चळण झाली आहे. त्यामुळे खड्डे चुकवताना दुसर्‍या खड्यात जाऊन कपाळमोक्ष होण्याची भीती असते. तसेच  शेजारीच असलेल्या बस थांब्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांच्या अंगावर चिखल उडण्याचीही भीतीही यात असते. पावसात सध्या या भागात वाहनधारकांची अशी कसरत सुरू आहे.

सोमवारी संध्याकाळी याच रस्त्यावरुन जाणार्‍या आमदारांच्या वाहनाच्या ताफ्यापैकी  आमदार उदय सामंत प्रवास करीत असलेली गाडी एका खड्ड्यात आदळली. त्यामुळे वाहनात असलेल्या आमदारांचे डोके गाडीच्या बॉनेटवर आदळता आदळता बचावले. या धक्याने आमदाराही खवळले. त्यांनी गाडीतून बाहेर उतरुन कोण इथला नगरसेवक.. इथपासून बोलवा नगराध्यक्षांना, अशी विचारणा करीत तेथेच खड्ड्यांचा पंचनामा सुरू केला. अखेर नगरसेवक आणि पालिकेचे कर्मचारी  घटनास्थळी आलेे त्यांना ही वस्तुस्थिती दाखविली. आमदार असताना एवढा त्रास होत असेल तर सर्वसमांन्याचे काय  असा सवाल करीत त्यांनी याबाबत जाब विचारायला सुरुवात केली.अखेर भ्रमणध्वनीवर संबंधिताकडे फोनाफोनी झाली. स्वतः आमदार रस्त्यावर उतरलेले. पालिकेची गाडी येऊन  आमदारांचीची गाडी ज्या खड्ड्यात आदळली त्या खड्ड्यांबरोबरच रस्त्यातील इतरही खड्डे भरण्यास तातडीने सुरुवात करण्यात आली.