Tue, Jul 16, 2019 02:05होमपेज › Konkan › जेव्हा नारायण राणेंचे कणकवलीत आगमन होते....

जेव्हा नारायण राणेंचे कणकवलीत आगमन होते....

Published On: Apr 13 2018 1:17AM | Last Updated: Apr 13 2018 1:17AMकणकवली : शहर वार्ताहर

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने नगराध्यक्षपदासहित 11 नगरसेवक निवडून आणून न.पं.वर आपला झेंडा रोवला. या विजयाची बातमी कळताच स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मुख्यमंत्री  खा. नारायण राणे हे मुंबईतून कणकवलीत तातडीने दाखल झाले.एस.एस.पी.एम. इंजिनिअरिंग कॉलेज येथे हेलिकॉप्टरने त्यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजयाच्या घोषणा देत ढोलताशाच्या गजरात जल्लोषी स्वागत केले. यावेळी सर्वांच्या चेहर्‍यावर विजयाचा आनंद दिसून येत होता. 

हेलिकॉप्टरमधून नारायण राणे उतरताच कार्यकर्त्यांनी त्यांना भेटण्यासाठी झुंबड केली होती.आ. नितेश राणे व नवनिर्वाचित नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पुष्पगुच्छ देऊन  त्यांचे स्वागत केले.खा. राणे यांनीही या दोघांना मिठी मारून आलिंगन दिले. खा. राणेंच्या दिमाखात झालेल्या आगमनाची मोबाईलमध्ये छबी टिपण्यासाठी सर्वाची झुंबड उडाली. निवडून आलेल्या उमेदवारांनी खा. राणेंची ओम गणेश बंगल्यावर भेट घेत आशीर्वाद घेतले. तर मिठाई देवून सर्वांचे तोंड गोड करण्यात आले. 

Tags : Konkan, Narayan Rane, Kankavli, swabhiman party