Wed, Jan 16, 2019 19:41होमपेज › Konkan › ‘प्रकल्प रद्द करायला भाग पाडू’ 

‘प्रकल्प रद्द करायला भाग पाडू’ 

Published On: Apr 13 2018 1:17AM | Last Updated: Apr 12 2018 10:17PMराजापूर : प्रतिनिधी

शासनाला हा प्रकल्प रद्द करायला भाग पाडू,  असे आ. साळवी म्हणाले. राजापूर पंचायत समितीची आमसभा येथील श्रीमंगल कार्यालयात गुरुवारी सकाळी 11 वाजता सुरु झाली. त्यावेळी आ. राजन साळवी व त्यांच्या सहकार्‍यांचे सभास्थानी आगमन झाल्यावर सभागृहाबाहेर संतप्त शिवसैनिकांनी नाणार प्रकल्पावरुन सौदी सरकारशी बुधवारी झालेल्या सामंजस्य कराराविरोधात प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

यावेळी आ. साळवींनी संतप्त भावना व्यक्‍त केल्या. प्रकल्पाच्या कामांसाठी येणार्‍या अधिकार्‍यांसह रत्नागिरी रिफायनरी अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल कंपनीचे अधिकारी जर प्रकल्पस्थळी फिरकले तर त्यांना आम्ही पिटाळून लावल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आ. साळवींनी दिला. अखेरच्या क्षणापर्यंत आम्ही लढा देऊन हा विनाशकारी प्रकल्प शासनाला रद्द करायला भाग पाडू, अशा शब्दांत आ. राजन साळवी यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्‍त केल्या. यावेळी अवजड वाहतूक सेनेचे संघटक दिनेश जैतापकर, शहरप्रमुख संजय पवार, सभापती सुभाष गुरव आदींसह सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags : Konkan, We, Participated, cancel, project