Wed, Jun 26, 2019 23:32होमपेज › Konkan › जलस्रोतांचे प्रदूषण : खासगी कंपन्यांना नोटिसा 

जलस्रोतांचे प्रदूषण : खासगी कंपन्यांना नोटिसा 

Published On: Mar 25 2018 1:49AM | Last Updated: Mar 25 2018 12:40AMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या परिघात असणार्‍या प्रक्रिया उद्योगांनी प्रदूषण तत्काळ रोखावे, नदी परिसरातील ज्या खासगी कंपन्या सांडपाणी नदीत सोडतात त्यांच्यावर तत्काळ कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश पर्यावरण मंत्रालयाने दिले आहेत. त्यानुसार नदीपासून 10 मीटर परिसरात असलेल्या खासगी कंपन्यांना नोटिसा पाठविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. 

जिल्ह्यातील प्रमुख नद्यांचा गाळउपसा करून त्या बारमाही प्रवाही राहण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानुसार नद्यांमधील गाळउपशावर 14 कोटींचा खर्च करण्यात आला. मात्र, त्यानंतरही नदीच्या परिघात असणार्‍या औद्योगिक आणि मानवी वसाहतींनी येथील नदीपात्रे गाळयुक्‍त केली. सांडपाण्यामुळे या नद्या प्रदूषित होत आहेत, तर बांधकाम करताना भराव टाकल्याने या नद्या पुन्हा गाळात रुतल्या आहेत. 

जिल्ह्यात अनेक नद्या या एमआयडीसी, तसेच प्रक्रिया उद्योगांच्या परिसरात आहेत. यामध्ये प्रामुख्याने जगबुडी, वाशिष्ठी आणि शास्त्री या नद्यांसह नारंगी, सोनवी, काजळी, बावनदी या नद्यांचा समावेश आहे. या नद्या जिल्ह्यातील प्रमुख  जलस्रोत असल्याने नद्यांच्या पाण्याबाबत जागरूकता आणण्यासाठी येथील उद्योगांना त्यांच्या सांडपाणी आणि प्रक्रिया जलनिस्सारणाचा अहवाल पर्यावरण मंत्रालयाने देण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रदूषण तत्काळ रोखण्यात यावे, नदी परिसरातील खासगी कंपन्या सांडपाणी नदीत सोडतात त्यांच्यावर तत्काळ कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश पर्यावरण मंत्रालयाने दिले आहेत.

 

Tags : Ratnagiri, Ratnagiri news, Water Resource Pollution, Private Companies, Notice,