Tue, Jul 16, 2019 10:23होमपेज › Konkan › गुहागर मार्गावरील पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया

गुहागर मार्गावरील पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया

Published On: Sep 06 2018 10:08PM | Last Updated: Sep 06 2018 8:53PMचिपळूण : खास प्रतिनिधी

चिपळूण-गुहागर मार्गावरील भागाडी येथे ‘एमआयडीसी’ची पाण्याची पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. गुरुवारी दुपारी 2.30 च्या सुमारास हा प्रकार घडला. यामुळे पाण्याचे कारंजे उडून गुहागर मार्गावर आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.

शिरळ येथील पंप हाऊसमधून पाणी उचलून ते पाणी पाईपलाईनद्वारे अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अ‍ॅण्ड पॉवर कंपनीला पुरविण्यात येते. एन्‍रॉनच्या काळात ‘एमआयडीसी’च्या माध्यमातून ही पाईपलाईन टाकण्यात आली. आता या पाईपलाईनला सुमारे वीस वर्षे होऊन गेली असल्याने पाण्याच्या दाबामुळे ठिकठिकाणी ती फुटत आहे व गळती होत आहे. 
अनेकवेळा ‘एमआयडीसी’च्या माध्यमातून गळती काढण्यात येते. मात्र, त्याने असे प्रकार घडत आहेत. गुरुवारी दुपारी भागाडी येथील रस्त्याच्या बाजूने जाणारी पाईपलाईन अचानक फुटली व तेथून उच्च दाबाने पाणी बाहेर उडाले. हे कारंजे थेट रस्त्यावर येत असल्याने पाण्याच्या दाबामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. येथील ग्रामस्थांनी याची माहिती ‘एमआयडीसी’ अधिकार्‍यांना दिली. यानंतर पाईपलाईन दुरूस्तीचे काम सुरू झाले आहे.