Sun, Sep 22, 2019 21:45होमपेज › Konkan › उबदार थंडीने आंबा बागायतदारांत उत्साह

उबदार थंडीने आंबा बागायतदारांत उत्साह

Published On: Dec 02 2017 12:39AM | Last Updated: Dec 01 2017 11:28PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

मध्यंतरी झालेल्या वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात अवकाळी सरी कोसळल्या. ऐन आंबा हंगामाच्या आरंभातच पावसाने  खोे घातल्याने आंबा मोहराला निर्माण  होणार्‍या संभाव्य  धोक्याने बागायदार धास्तावले होते. मात्र, गेले काही दिवस पडलेल्या उबदार थंडीच्या दुलईने आंबा मोहरासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने  बागायतदारांध्ये फळांच्या राजाच्या बेगमीसाठी उत्साह संचारला आहे.

ढगाळ वातावरणामुळे नोव्हेंबरच्या शेवटच्या दहा दिवसांत थंडीचा कडाका कमी झाला होता. वातावरणातील या बदलाने  रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागात चिपळूण आणि संगमेश्‍वर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. ऐन आंबा हंगामाच्या सुरुवातीलाच जिल्हाभर मळभी वातावरण कायम होते. दोन दिवसांत जिल्ह्यात  0.78 मिमी आणि  0.20 मिमी नोंद झाली होती. अवकाळी पावसाने नुकताच फुटवा धरलेल्या पालवीवरील मोहर गळून पडण्याची भीती होती.  कडाक्याची थंडी पडायला लागल्यावर आंबा कलमांना मोहर येण्यास प्रारंभ होतो. गेले तीन चार दिवस सकाळच्या वेळी दाट धुके पडत असून थंडीचा कडाकाही हळूहळू वाढत आहे.

दरम्यान, दिवसाही हवेत गारवा जाणवत आहे. असे वातावरण आंबा झाडांना मोहर येण्यास उपयुक्‍त ठरते. त्यामुळे आंबा बागायतदारांतमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आंबा बागायतीतील काही कलमांना नवा फुटवा धरू लागला आहे. त्यामुळे नव्या फुटव्याने कलमांना मोहर येण्याची शक्यता बागायतदारांतून व्यक्‍त होत आहे.