होमपेज › Konkan › प्रेयसीसोबत लग्‍नासाठी पत्नीसह चिमुरड्याचा खून

प्रेयसीसोबत लग्‍नासाठी पत्नीसह चिमुरड्याचा खून

Published On: Jun 11 2018 1:06AM | Last Updated: Jun 10 2018 10:24PMवाकड : वार्ताहर

प्रेयसीसोबत लग्‍न करण्यासाठी पत्नीसह आठ महिन्यांच्या बाळाचा खून केल्याची धक्‍कादायक घटना शनिवारी (दि. 9) रात्री दहाच्या सुमारास हिंजवडी परिसरातील नेरे-जांबे रस्त्यालगत घडली.
अश्‍विनी भोंडवे (वय 27) व अनुज भोंडवे (वय 8 महिने) अशी खून झालेल्या माय-लेकरांची नावे आहेत. या हत्येप्रकरणी अश्‍विनीचा पती दत्ता वसंत भोंडवे (30, रा. दारुंब्रे, ता. मावळ) याच्यासह त्याची प्रेयसी सोनाली बाळासाहेब जावळे (24, रा. आदर्श कॉलनी, वाकड) व त्यांचे दोन साथीदार प्रशांत जगन भोर (25, रा. माण, ता. मुळशी), पवन नारायण जाधव (21, रा. हिंजवडी) यांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. 

या दुहेरी हत्याकांडाबाबत परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्‍त गणेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हिंजवडी पोलिसांना खबर मिळाली की, अज्ञात मारेकर्‍यांनी हल्ला करून एक महिला व तिच्या लहान बाळाचा खून केला आहे. अंगावरील सोने व रोख रक्‍कमदेखील लुटण्यात आली आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार दत्ता भोंडवेने तशी फिर्याददेखील दिली होती.