Tue, Jun 25, 2019 21:21होमपेज › Konkan › विजयदुर्ग महोत्सवनिमित्त कार्यक्रमांची मेजवानी

विजयदुर्ग महोत्सवनिमित्त कार्यक्रमांची मेजवानी

Published On: Dec 21 2017 1:53AM | Last Updated: Dec 20 2017 8:51PM

बुकमार्क करा

विजयदुर्ग : वार्ताहर

विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाच्यावतीने  नववर्षाच्या स्वागत निमित्त विजयदुर्ग महोत्सव आयोजित केरण्यात आला आहे.   29,30 व 31 डिसेंबर या कालावधीत हा महोत्सव विविध सास्कृंतिक कार्यक्रमांनी हा महोत्सव रंगणार आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी  वाळूशिल्प व रांगोळी प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.या महोत्सवासाठी ‘गाव आपलो,सन्मान सर्वांचो’ हे ब्रीद वाक्य आहे.

महोत्सवा निमित्त 29 रोजी सकाळी 9 ते 10 लेझिम पथकासह मिरवणूक-एस.टी.डेपो ते विजयदुर्ग किल्ला, सकाळी 10 ते 10.30 विजयदुर्ग किल्ला येथे सर्वधर्मीय प्रार्थना, सकाळी 10.30 ते 11 मिरवणूक-विजयदुर्ग किल्ला ते पोर्ट ट्रस्ट ऑफिस, सकाळी 11 वा. पोर्ट ट्रस्ट ऑफिस येथे महोत्सवाचे उद्घाटन,  दु. 11.30 वाजता अल्पोपहार.

दुपारच्या सत्रात दुपारी 3 ते 5 विजयदुर्ग किल्लेदर्शन (इतिहासतज्ज्ञ अमर अडके सोबत),संध्याकाळी 5 ते 6 सेंद्रिय शेती मार्गदर्शन ,संध्याकाळी 6 ते 8 जुन्या-नव्या गाण्यांचा कार्यक्रम, रात्री 8 ते 10 विविध शाळां मधील विद्यार्थ्यांचे नृत्य कार्यक्रम,रात्री 10 वाजता मालवणी काव्य वाचन व कॉमडी.

30 डिसेंबर रोजी  सकाळी 9 ते 11 वा. विजयदुर्ग चौपाटी येथे  तालुकास्तरीय शालेय विद्यार्थ्यांसाठी किल्लेबांधणी स्पर्धा, सकाळी 9 ते दुपारी 12 जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा. सायं. 4 ते 5 महिलांसाठी आरोग्यविषयी मार्गदर्शन, त्या नंतर होम मिनिस्टर, संध्याकाळी 6 ते 8 स्थानिक महिलांचे कार्यक्रम,रात्री 8 ते 10 सुरसंगम- कार्यक्रम, रात्री 10 वाजता कलंदर ग्रुप आयोजित धमाल विनोदी कार्यक्रम सादरकर्ते- रविकांत राणे.

31 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 10 स्लो सायकलिंग स्पर्धा- इ.5 ते 10 च्या   विद्यार्थ्यांसाठी, सकाळी 10 ते 1 तालुकास्तरीय नौकानयन (पगार वल्हवणे)स्पर्धा, संध्याकाळी 4 ते 7 कोल्हापुरी मर्दानी खेळ. दुपारच्या सत्रात संध्याकाळी 7 ते 9  पोवाडा गायन, रात्री 9 वा. विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्‍तींचा सत्कार तसेच महोत्सवांतर्गत  स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार. त्यानंतर  मध्यरात्री ऑर्केस्ट्रा आणि फटाक्यांच्या आतषबाजीत नववर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे. या तीन दिवस चालणार्‍या महोत्सवा दरम्यान विविधरंगी कार्यक्रमांबरोबरच रोमहर्षक रोषणाई आणि विजयदुर्ग किल्ला व समुद्र सफरीचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवहन मंडळाचे मुंबई अध्यक्ष नितीन जावकर व विजयदुर्ग अध्यक्ष डॉ.यश वेलणकर यांनी केले आहे.