Wed, Jun 03, 2020 02:35होमपेज › Konkan › विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी गोळा केला ५०० किलो इ-कचरा

विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी गोळा केला ५०० किलो इ-कचरा

Published On: Dec 28 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 8:26PM

बुकमार्क करा
कणकवली  : शहर वार्ताहर 

इ-कचरा हा मानवी आरोग्याला व पर्यावरणास घातक असल्याने शहारातील  या  कचर्‍याचे प्रमाण कमी व्हावे. या उद्देशाने विद्यामंदिर हायस्कूलचे पर्यावरण सेवा योजना प्रमुख व कणकवली स्वच्छता ‘ब्रँड अ‍ॅम्बेसीडर’प्रसाद राणे यांनी विद्यार्थ्यांसाठी इ-कचरा एकत्र करण्याची स्पर्धा जाहीर केली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेत चार दिवसात आपल्या घरातील व परिसरातील सुमारे 500 किलो एवढा इ-कचरा गोळा केला. जमा केलेला हा कचरा रत्नागिरी येथे पुनर्वापरासाठी पाठवण्यात आला.यातून मिळालेल्या पैशातून प्रत्येक वर्गात उत्तम दर्जाची कचरा पेटी ठेवण्यात आली आहे. 

इ-कचर्‍यामध्ये जुने टीव्ही, मोबाईल, कम्प्युटर सर्किट, एलईडी बल्ब, वायर,  मिक्सर, बॅटरी, इस्त्री, प्रिंटर आदी वस्तूचा समावेश होता. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रसाद राणे यांना मुख्याध्यापक हेमंत खोत यांचे मार्गदर्शन तर शिक्षक जे. जे. शेळके, विद्या अंधारी यांचे सहकार्य लाभले. 

यावेळी श्री. राणे यांनी विद्यार्थ्यांना इ-कचर्‍याचे दुष्परिणाम समजावून सांगितले. तर अशाच पद्धतीने इतर शाळांनी व नागरिकांनी स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबवून स्वच्छ सर्वेक्षण 2018 या कणकवली न.पं.च्या कार्यक्रमास सहकार्य करावे.असे आवाहन मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी केले. अमोल भोगले, मनोज धुमाळे, सतीश कांबळे, ध्वजा उचले, हर्षद पाताडे, सुभाष उबाळे आदी न.पं. कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते .