Wed, Mar 27, 2019 03:56होमपेज › Konkan › अखेर वेरळ ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा

अखेर वेरळ ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा

Published On: Feb 20 2018 1:17AM | Last Updated: Feb 19 2018 11:21PMविरण : वार्ताहर

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत वेरळ ग्रामपंचायतीवर गाव विकास पॅनेलने एक हाती सत्‍ता प्रस्थापित केली होती. दरम्यान पॅनेलचे प्रमुख आबा दामोदर परब यांनी शिवसेना पक्षावर विश्‍वास दाखवत ग्रामविकास पॅनल व ग्रामस्थांसह  सेनेत जाहीर प्रवेश केला आहे. यामुळे वेरळ ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. 

वार्षिक जत्रोत्सवाचे औचित्य साधून हा पक्षप्रवेश सोहळा खा.विनायक राऊत व आ.वैभव नाईक, शिवसेना मालवण तालुकाप्रमुख बबन शिंदे, नागे्रंद्र परब यांच्या उपस्थितीत पार पडला.  सरपंच सौ.आनंदी परब, उपसरपंच शंकर चव्हाण, सदस्य भगवान परब, निकिता पोयरेकर, सोनाली खरात, सुविधा मापारी, रंजना तांबे, वेरळ शाखाप्रमुख सुरेश मापारी, गोपी पालव, पराग खोत, विजय पालव, पंकज वर्दम, नाना नेरूरकर, समीर हडकर, सतीश परब, दयानंद वाडकर, बंडया वाडकर, अमित भोगले, रघुनाथ सरनाईक, दिनेश परब आदींसह काही ग्रामस्थांनी यावेही शिवसेनेत प्रवेश केला. 

आ.वैभव नाईक म्हणाले,  मागील निवडणुकीत वेरळ गावातील  मतदारांनी शिवसेनेला मताधिक्य दिले आहे. यामुळे वेरळ गावातील विकास कामे, समस्या प्राधान्याने मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले.   खा. विनायक राऊत  म्हणाले,    वेरळ गावच्या जनतेने शिवसेनेवर दाखवलेल्या विश्‍वास आम्ही विकास कामाच्या माध्यमातून सार्थकी लावू.  गावातील कोसळलेली सार्वजनिक विहीर व नळपाणी योजना दुरुस्तीसाठी निधी उपल्बध करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यापुढे वेरळ गावच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.  आभार आबा परब यांनी मानले.