Fri, Apr 26, 2019 09:20होमपेज › Konkan › वेंगुर्लेचा स्वच्छता पॅटर्न देशासाठी आदर्शवत : पोपटराव पवार

वेंगुर्लेचा स्वच्छता पॅटर्न देशासाठी आदर्शवत : पोपटराव पवार

Published On: Nov 30 2017 11:31PM | Last Updated: Nov 30 2017 10:19PM

बुकमार्क करा

वेंगुर्ले : शहर वार्ताहर 

वेंगुर्ले शहराच्या विकासाठी व राज्यात आदर्शवत ठरलेला वेंगुर्ले नगरपालिकेचा स्वच्छतेचा पॅटर्न पाहण्यासारखा आहे. या शहराला भेट देण्याचा मोह आवरता आला नाही, असे प्रतिपादन अहमदनगर येथील हिवरे बाजार ग्रामपंचायतीचे सरपंच, महाराष्ट्र राज्य ग्राम योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी केले. यावेळी त्यांनी वेंगुर्ले नगरपालिकेच्या डंपिंग ग्राउंड येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला भेट दिली.

 पोपटराव पवार हे सिंधुदुर्गात आले असता त्यांनी वेंगुर्ले नगरपालिकेला भेट देत पालिकेच्या रामघाट रोड येथील कचरा डंपिंग ग्राऊंडला भेट देऊन पाहणी केली. नगराध्यक्ष दिलीप गिरीप यांनी त्यांचे स्वागत केले. कर्जत नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, नगरसेवक प्रशांत आपटे, कर्मचारी सागर चौधरी, विलास ठुंबरे आदी उपस्थित होते. पोपटराव पवार यांनी वेंगुर्ले नगरपरिषदेने केलेल्या घनकचरा प्रकल्प व स्वच्छता व्यवस्थापनाचे कौतुक केले.  नगरपरिषदेची शून्य कचरा मोहीम संपूर्ण राज्यासाठी आदर्शवत आहे.  इतर शहरानीही वेंगुर्ले शहराचा आदर्श घेऊन स्वच्छतेसाठी पुढाकार घेतल्यास भविष्यात कचराही समस्या नाहीशी होईल असे ते म्हणाले.

राजकीय नेतृत्व व प्रशासकीय यंत्रणा एकत्र आली तर समाज बदलण्यास वेळ लागणार नाही. वेंगुर्ले पॅटर्न आता देशाला दिशा देणारे मॉडेल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय योग्य असल्याचा वेंगुर्ले शहरात पहावयास मिळाले.