Wed, Mar 20, 2019 08:32होमपेज › Konkan › वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाला मिळणार ‘उपजिल्हा’चा दर्जा

वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाला मिळणार ‘उपजिल्हा’चा दर्जा

Published On: Jan 20 2018 1:40AM | Last Updated: Jan 19 2018 10:50PMवेंगुर्ले : प्रतिनिधी 

वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाची पुनर्बांधणी केली जाणार आहे. यासाठी राज्य शासनाने साडेसात कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यातून अनेक सुविधा निर्माण केल्या जातील. त्यामुळे वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त होणार आहे. या कामाचा प्रारंभ 26 जानेवारी रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे,  अशी माहिती  खा. विनायक राऊत यांनी दिली.  

 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वेंगुर्ले दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर  तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक खा. विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत, तालुकाप्रमुख बाळा दळवी, सभापती यशवंत परब, महिला जिल्हाध्यक्षा सौ. जान्हवी सावंत, जि. प. गटनेते नागेंद्र परब, उपनगराध्यक्षा सौ. अस्मिता राऊळ, नगरसेविका सौ. सुमन निकम, माजी सभापती सौ. सुचिता वजराठकर, भाई मोरजकर, आबा कोंडसकर, कार्यालय प्रमुख बाळा नाईक, माजी जि.प. सदस्या सौ. सुकन्या नरसुले, वेंगुर्ले  ग्राहक संरक्षण कक्ष तालुकाप्रमुख रवींद्र नरसुले, नगरसेवक संदेश निकम आदी उपस्थित होते. खा. विनायक राऊत म्हणाले,  या निधीतून डॉक्टरांसाठी निवासाची व्यवस्था, पोस्टमार्टेम रुम, डायलिसिस सुविधा आदी प्रमुख सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.