Sun, Nov 18, 2018 07:04होमपेज › Konkan › कलिंगड खायला आली म्हणून गाईवर चाकूने हल्ला

कलिंगड खायला आली म्हणून गाईवर चाकूने हल्ला

Published On: Mar 11 2018 10:44PM | Last Updated: Mar 11 2018 10:07PMवेंगुर्ले : प्रतिनिधी

 शिरोडा आठवडा बाजारात आलेल्या एका परगावातील कलिंगड विक्रेत्याने कलिंगड खाण्यासाठी गेलेल्या गाईवर चाकुने हल्ला केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे एकच आरडाओरड झाली. मात्र त्या विक्रेत्याने घाबरुन तेथे पळ काढला. परंतु त्याच्या सोबत असलेल्या सहविक्रेत्याला बाजारात आलेल्या नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. सर्वांनी संताप व्यक्त करत त्या साथीदाराला यथेच्छ चोप दिला. दरम्यान या प्रकरणी सांयकाळी उशिरा पर्यंत पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती. 

शिरोडा येथे रविवारी आठवडा बाजार असतो. त्यामुळे बाजारात खूप गर्दी असते. रविवारी सकाळी 10.30 वा. च्या सुमारास एसटी स्टॅण्ड नजीक कलिंगड विक्री करणार्‍याच्या बाजूने जाणार्‍या गाईने कलिंगड पाहून ते खाण्यासाठी तोंड कलिंगडाला लावले. 

याचा राग येवून त्या कलिंगड विक्रेत्याने हातातील कलिंगड कापण्याच्या सुरीने गाईवर हल्ला करत तिला रक्तबंबाळ केले. अचानक उद्भवलेला हा प्रसंग पाहून क्षणार्धात तेथे लोकांनी गर्दी केली. मात्र तोपर्यंत तो कलिंगड विक्रेता तेथून प्रसार झाला. मात्र गाईवर सुरी हल्ला झाल्याचा प्रकार लक्षात येताच संतप्त झालेल्या नागरिकांनी त्या कलिंगड विक्रेत्यासोबत असलेल्या सहविक्रेत्याला यथेच्छ चोप 
दिला. परगावातून येणार्‍या व्यापार्‍यांनी आपली मर्यादा न ओलांडता व्यापार करावा असा इशारा नागरिकांनी दिला. दरम्यान दिवसभर हे प्रकरण शिरोड्यात चर्चेले जात होते. मात्र, उशिरापर्यंत पोलिसांकडे याबाबत कोणतीही नोंद झाली नव्हती.