Wed, Apr 24, 2019 19:40होमपेज › Konkan › वेंगुर्ले पोलिस निरीक्षकांविरोधात मारहाणीची तक्रार दाखल

वेंगुर्ले पोलिस निरीक्षकांविरोधात मारहाणीची तक्रार दाखल

Published On: Dec 10 2017 1:19AM | Last Updated: Dec 09 2017 10:16PM

बुकमार्क करा

सावंतवाडी : प्रतिनिधी 

मळेवाड घोडेमुख रस्त्यावरुन कारने जाताना तपासणीच्या नावावर वेंगुर्ले पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी मारहाण करुन शिवीगाळ केल्याची तक्रार सावंतवाडी शहरातील फार्मासिस्ट शांताराम कुरबा गावडे यांनी  वेंगुर्ले पोलिसात दिली आहे. याप्रकरणी गावडे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्याकडेही तक्रार केली आहे.

या तक्रारीत शांताराम गावडे यांनी म्हटले आहे, हा प्रकार शुक्रवारी आठ डिसेंबरला घडला. गावडे  हे शिरोडा येथील मेडिकल स्टोअर्स बंद करुन रात्रौ नऊच्या सुमारास सावंतवाडी येथे घरी जात होते. त्यांच्यासमवेत त्यांचे  राजन मुळीक हे  होते. द रम्यान घोडेमुख येथे  गस्त घालणार्‍या पोलिसांनी त्यांची कार तपासणीसाठी थांबविली असता  राजन मुळीक यांनी ‘साहेब आमच्या गाडीचा नंबर लिहून घ्या म्हणजे नेहमी थांबावे लागणार नाही. आम्ही रोज याच मार्गाने जातो.’  असे  पोलिस निरीक्षक कोळी याना सांगितले. यावर श्री. कोळी यांनी मुळीक यांना गाडीतून खेचून बाहेर काढले. व तुम्हाला शिकवतो  असे सागंत दोघांनाही दांडगाईने  पोलिस जीपमध्ये कोंबले व   वेंगुर्ले पोलिस स्थानकात नेले. तेथे सरकारी कामात व्यत्यय आणला म्हणून गुन्हा दाखल करण्याची  धमकी दिली.

याबाबत सावंतवाडीतील पत्रकार सीताराम गावडे यांनी एसपींना कळविल्यानंतर श्री. कोळींनी मी तुम्हाला समज देऊन सोडले तुम्ही आता निघा, असे ए सांगितले तर  गावडेंनी माझ्यावर गुन्हा दाखल करून आतच टाका, अशी मागणी केली