Mon, Nov 19, 2018 20:10



होमपेज › Konkan › वैभवसंपन्न देशासाठी आरएसएस शिवाय पर्याय नाही 

वैभवसंपन्न देशासाठी आरएसएस शिवाय पर्याय नाही 

Published On: Jan 10 2018 1:58AM | Last Updated: Jan 09 2018 9:17PM

बुकमार्क करा




वेंगुर्ले : प्रतिनिधी

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम कोणाच्या विरोधात नाही. हा समाज माझा आहे, ही प्रेरणा घेऊन सामाजिक परिवर्तन करण्याचे काम संघ करतो. या देशाला वैभवसंपन्न करायचे असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशिवाय पर्याय नाही. त्यासाठी समाजातील सर्व सज्जन शक्तींनी एकत्रित काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोकण प्रांताचे कार्यकारिणी सदस्य राजन दळी यांनी केले.   राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वेंगुर्लेतर्फे येथील कॅम्प मैदानावर हिंदू चेतना संगम’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपिठावर उभादांडा येथील ह.भ.प.सावळाराम कृष्णा कुर्ले, तालुका संघ चालक संजय प्रभाकर शिरसाट आदी उपस्थित होते. 

श्री. दळी म्हणाले, गेली 93 वर्षे ही संंघटना देशाच्या कानाकोप-यात कार्यरत आहे. जगातील 50 देशात संघाचे कार्य चालतेे. या संघामार्फत चिपळूण येथे वसतीगृह,  माणगांव येथे फळप्रक्रिया प्रशिक्षण, फिरत्या विज्ञान प्रयोगशाळा, दुर्गम भागात आरोग्य रक्षक आदी योजना सुरु आहेत. देशातील भेद नष्ट करुन आपण सर्व एक आहोत, ही भावना निर्माण करण्याचे काम संघ करतो. देशातील कोणताही भाग राष्ट्रीयत्वापासून दूर राहू नये यासाठी संघ काम करतो. समाजाच्या विविध क्षेत्रात, प्रशासनात, राजकारणात ही सज्जन माणसे आहेत. या सज्जन शक्तींनी एकत्र आल्यास देशाचे कल्याण व्हायला वेळ लागणार नाही, असे दळी म्हणाले.

 ज्यामुळे आपले कल्याण होते. तो धर्म-धर्माची दहा लक्षणे आहेत. या लक्षणांमुळे माणूसू ओळखला जातो. धर्म माणसाची प्रतिष्ठा वाढवितो. जेथे धर्म आहे, तेथे विजय असतो, भगवंत असतो. धर्म ही दाखवायची गोष्टी नाही. प्रत्येकाने आपल्या धर्मावर प्रेम करावे, असे आवाहन ह.भ.प.कुर्ले यांनी केले. प्रास्ताविक गुरुप्रसाद खानोलकर यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक  संघाचे कार्यकर्ते व नागरीक  उपस्थित होते.