Tue, Apr 23, 2019 09:50होमपेज › Konkan › उपसरपंचांच्या अटकेसाठी दाभोली ग्रामस्थांचे आंदोलन

उपसरपंचांच्या अटकेसाठी दाभोली ग्रामस्थांचे आंदोलन

Published On: May 13 2018 10:23PM | Last Updated: May 13 2018 8:51PM वेंगुर्ले : प्रतिनिधी 

जमिनीच्या वादातून मारहाण केल्याप्रकरणी दाभोली उपसरपंच संदीप पाटील यांच्या अटकेसाठी ग्रामपंचायतमध्ये ग्रामस्थांचे आंदोलन केले. रात्री उशिरा वेंगुर्ले पोलिसांनी तसे आश्‍वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. 

  दाभोली उपसरपंच संदीप पाटील यांनी दशरथ गिरप यांना मारहाण केल्याप्रकरणी येथील ग्रामस्थांनी त्यांच्या अटकेसाठी शनिवारी ठिय्या आंदोलन छेडले. रात्री उशीरा वेंगुर्ले पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचे  आश्‍वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. उपसरपंच संदीप पाटील यांनी या प्रकरणाला विरोधक फूस लावून राजकीय वळण लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. 

दाभोली- मोबारवाडी येथील जमिनीच्या वादातून घडलेल्या या घटनेबाबत परस्परविरोधी तक्रारी पोलिसात दाखल केल्यानंतर शुक्रवारी  दुपारी 12.15 वा. च्या सुमारास दशरथ गिरप व राजेश पेडणेकर हे  दाभोली ग्रामपंचायतीत जागेची माहिती घेण्या निमित्त गेले असता संदीप पाटील व राजाराम कांबळी यांनी त्यांना ग्रा. पं. कार्यालयताच लाथा, बुक्यांनी व ठोश्याने मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार अनुराधा दशरथ गिरप यांनी वेंगुर्ले पोलिस स्थानकात दिली आहे. 

या मारहाणीत जखमी  दशरथ गिरप यांना तत्काळ उपचारासाठी वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. तर या घटनेनंतर त्यांच्या पत्नी अनुराधा गिरप व येथील महिला तसेच ग्रामस्थानी ग्रामपंचायत कार्यालयातच उपसरपंचांना अटक करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन छेडले. रात्री उशीरापर्यंत चाललेल्या या आंदोलनाला पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी भेट देत संबंधितावर तत्काळ कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्यानंत हे आंदोलन मागे घेण्यात आले. या घटनेनंतर दाभोलीत तणावाचे वातावरण निर्माण झाले .